esakal | सारंग कुसरे यांचे 'कविताष्टक' प्रकाशीत
sakal

बोलून बातमी शोधा

sarang kasure

सारंग कुसरे यांचे 'कविताष्टक' प्रकाशीत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लेखक सारंग जयंत कुसरे यांनी लिहीलेले 'कविताष्टक' ई-बुक ऍमेझॉनवरून नुकताच प्रकाशीत झाला आहे. कुसरे हे मुळचे नागपूरचे असून, कामानिमित्त त्यांचे लंडनमध्ये वास्तव्य आहे. कुसरे यांचा यापूर्वी 'संवादाक्षरे' व 'गोष्ट तुझी माझी' हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे.

'कविताष्टक' पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती
जसे 'हायकू' म्हणजे तीन ओळींचे काव्य, 'चारोळी' म्हणजे चार ओळींच्या कविता, तसेच 'कविताष्टक' म्हणजे आठ ओळींच्या कविता. पण 'आठचं ओळी' का? असं जर कुणी मला विचारलं तर त्याला माझं उत्तर असं की, आठ ओळी लिहिल्यावर, त्या आठ ओळीत पूर्ण गोष्ट, पूर्ण भाव सांगितल्याचं समाधान मला मिळतं होतं, एक वर्तुळ पुर्ण झाल्याचा भास होत होता, म्हणुन आठ ओळी. माझ्या या पुस्तकात मी एकूण ६४ कविता समाविष्ट केल्या आहेत, ८*८ = ६४, या आकडेमोडीनुसार. या ६४ कवितांमध्ये अनेक विषय आहेत, काही सोपे आहेत तर काही गूढ, काही सामाजिक आहेत तर काही वैयत्तिक. गेल्या अनेक वर्षातील घडलेल्या घटना (सामाजिक / वैयत्तिक), त्याचे मनावर उमटलेले पडसाद, त्यातून या ६४ कवितांचा, 'कविताष्टकांचा' जन्म झाला.

'कविताष्टक' कवितासंग्रह म्हणजे नक्की काय, ह्याचेच उत्तर म्हणजे ह्या आठ ओळी;
८ ओळींची ६४ चित्रं...
काही सरळ तर काही विचित्र..!
८ ओळींच्या ६४ दिशा...
कुठे उषा तर कुठे निशा..!
८ ओळींचे ६४ संवाद...
काही स्वतःशीच तर काही प्रतिसाद..!
८ ओळींचे ६४ कोष्टक...
प्रत्येक कोष्टक एक 'कविताष्टक'...!

यात निरनिराळे कवितांचे प्रकार, जसे की गझल, मुक्तछंद, ओव्या, छंदबद्ध इत्यादि हाताळण्यात आलेले आहेत. सगळ्याच कविता आठ ओळींच्या आहेत फक्त गझल प्रकारातील कविताष्टकात 'मतला' (मथळा) वगळून आठ ओळींचा घाट घातला आहे. आशा करतो की तुम्हाला 'कविताष्टकं' नक्की आवडतील...!

लेखकाविषयी थोडं...
माझं नाव सारंग जयंत कुसरे, मुळचा मी नागपूरचा पण आता कामानिमित्त लंडन येथे वास्तव्यास असतो. मी ERP consultant आहे. “कविताष्टक” हे माझं तिसरं पुस्तक. या आधी माझा “गोष्ट तुझी माझी” हा कविता संग्रह आणि “संवादाक्षरे” हा संवाद संग्रह प्रकाशित झालेला आहे. “Poetically तुमचाचं” या माध्यमातून मी कविता आणि कथा वाचनाचे प्रयोग लंडन , लेस्टर, स्लाव येथे केले आहेत. भारतात पुणे आणि नागपूर येथे देखील प्रयोग केले आहेत.शिवाय European Marathi Sammelan 2016, Almelo Netherlands आणि London Marathi Sammelan 2017  येथे काही कविता सादर केल्या आहेत. London Marathi Sammelan 2017 ला अनुसरून एक पोवाडा रचला होता, ज्याचं सादरीकरण सोहळ्याच्या सुरवातीला झालं. या शिवाय NuSound Radio 92 FM, London येथे कविता / कथा वाचनाचे १ तासाचे ३ कार्यक्रम केलेले आहेत.

माझे youtube channel देखील आहे आणि तिथे मी कविता वाचन करीत असतो. शिवाय माझ्या facebook page वर facebook live च्या माध्यमातून मी कविता वाचन करीत असतो.

तुम्हाला माझ्याशी संपर्क साधायचा असल्यास किंवा प्रतिक्रिया कळवायच्या असल्यास किंवा पुस्तकातील चुका सांगायच्या असल्यास तुम्ही मला  kusaresarang@gmail.com किंवा poeticallytumchach@gmail.com या पत्यावर email करू शकता. तुमच्या emails च्या प्रतीक्षेत...!

खालील links वरून “गोष्ट तुझी माझी”, “संवादाक्षरे” आणि “कविताष्टक”  खरेदी करता येतील:

गोष्ट तुझी माझी - http://www.bookganga.com/…/Books/Details/5107332806760751159

संवादाक्षरेhttp://amzn.in/4vZzEWy

कविताष्टक - http://amzn.in/hxMYmBU