esakal | गल्फमध्ये ‘पुलंची हास्यनगरी’
sakal

बोलून बातमी शोधा

Pu La Deshpande

पुलंच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून जात ‘आम्ही एकपात्री’च्या पाच पुणेरी कलाकारांनी सुरू केलेल्या ‘पुलंची हास्यनगरी’ या कार्यक्रमाला गल्फ देशातील ओमान येथील सलालाह या शहरातील मराठी मित्र मंडळाकडून आमंत्रण मिळाले आहे.

गल्फमध्ये ‘पुलंची हास्यनगरी’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुलंच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून जात ‘आम्ही एकपात्री’च्या पाच पुणेरी कलाकारांनी सुरू केलेल्या ‘पुलंची हास्यनगरी’ या कार्यक्रमाला गल्फ देशातील ओमान येथील सलालाह या शहरातील मराठी मित्र मंडळाकडून आमंत्रण मिळाले आहे.

‘आम्ही एकपात्री’चे कलाकार वंदन राम नगरकर, संतोष चोरडिया, महेंद्र गणपुले, डॉ. कविता घिया आणि अनुपमा खरे या कलावंतांचा यात समावेश आहे. हा कार्यक्रम २० सप्टेंबर रोजी ‘ग्लोबल पुलोत्सवा’अंतर्गत आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी डॉ. सतीश देसाई आणि सचिन इटकर यांचे सहकार्य लाभले आहे.

पुलंच्या जन्मशताब्दी-निमित्त हा कार्यक्रम सादर करण्याचे आमंत्रण त्यांना मिळाले असून, यात महेंद्र गणपुले हे ‘चितळे मास्तर’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. ‘बिगारी ते मॅट्रिक’ही सादर करणार आहेत. पुलंनी संगीतबद्ध केलेली गाणी अनुपना खरे सादर करणार आहेत. संतोष चोरडिया आणि डॉ. कविता घिया ही जोडी सूत्रसंचालकांच्या भूमिकेतून अनुक्रमे चिमणराव आणि कावेरी या पात्रांच्या माध्यमातून पुलंचा जीवनपट संवादाच्या रूपाने उलगडणार आहेत. तसेच, नगरकर हे ‘रामनगरी’तील पुलंचा आवडता लग्नाचा किस्सा सादर करणार आहेत. 

दोन तासांच्या या कार्यक्रमात दृक्‌श्राव्य माध्यमाद्वारे पुलंचे काही दुर्मीळ ध्वनी आणि चलचित्रफीत दाखविण्यात येणार आहे.