esakal | चक्क ! अमेरिकेतील पोलिसांनी साजरं केल 'रक्षाबंधन' !! 
sakal

बोलून बातमी शोधा

rakshabandan-in-america.jpg

अमेरिकेतील शहरांमध्ये एवढंच काय तर, व्हाइट हाऊसमध्येही 'दिवाळी' मोठ्या दिमाखात साजरी करण्यात येते. पण यावर्षी अमेरिकेतील काही शहरांत चक्क 'रक्षाबंधन'ही साजरी करण्यात आले आणि ते ही 'अमेरिकन पोलिसां'सोबत !!
नुकतेच टेक्‍सास राज्यातील 'कॉपेल' शहराच्या पोलिस ठाण्यात 'रक्षाबंधन' साजरे करण्यात आले.

चक्क ! अमेरिकेतील पोलिसांनी साजरं केल 'रक्षाबंधन' !! 

sakal_logo
By
सम्राट कदम

पुणे : अमेरिकेतील शहरांमध्ये एवढंच काय तर, व्हाइट हाऊसमध्येही "दिवाळी' मोठ्या दिमाखात साजरी करण्यात येते. पण यावर्षी अमेरिकेतील काही शहरांत चक्क 'रक्षाबंधन'ही साजरी करण्यात आले आणि ते ही 'अमेरिकन पोलीसां'सोबत !! नुकतेच टेक्‍सास राज्यातील 'कॉपेल' शहराच्या पोलिस ठाण्यात 'रक्षाबंधन' साजरी करण्यात आले. येथील ठाणे अंमलदारासहीत कर्मचाऱ्यांचे या वेळी विधिवत 'औक्षण' करण्यात आले. त्यानंतर त्यांना "राख्या' बांधण्यात आल्या आणि त्यानंतर जोरदार फोटोसेशनही करण्यात आले. 

या संबंधीची पोस्ट कॉपेल पोलिसांनी नुकतीच फेसबुकवर प्रकाशित केली आहे. त्यात ते म्हणतात,"अमेरिकेतील हिंदू स्वयंसेवक संघाच्या सदस्यांसोबत आज रक्षाबंधन साजरी करण्यात आले. त्यांनी कॉपेल पोलिसांना दर्शविलेला पाठिंबा आणि दिलेल्या सदिच्छांमुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. कॉपेल शहरात किती महान समुदाय राहात असल्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.'' कॉपेल शहरात राहणाऱ्या भारतीय महिलांनी पोलिस कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या तेंव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. कुटूंबव्यवस्थेचा अभाव असलेल्या अमेरिकेतील कर्मचाऱ्यांसाठी ही नवलाची गोष्ट होती. त्यांनी उत्साहात आपले राखी बांधलेले फोटोही समाजमाध्यमांवर प्रकाशित केले. 

हिंदू स्वयंसेवक संघ ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) आंतरराष्ट्रीय शाखा आहे. विविध देशांतील स्थानिक पोलिसांना राख्या बांधून भारतीय जनसमुदाय "रक्षाबंधन' साजरी करते. 


 

loading image
go to top