esakal | सारंग कुसरे यांचे 'संवादाक्षरे' प्रकाशीत
sakal

बोलून बातमी शोधा

sarang kasure

सारंग कुसरे यांचे 'संवादाक्षरे' प्रकाशीत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लेखक सारंग जयंत कुसरे यांनी लिहीलेले 'संवादाक्षरे' ई-बुक ऍमेझॉनवरून नुकताच प्रकाशीत झाला आहे. कुसरे हे मुळचे नागपूरचे असून, कामानिमित्त त्यांचे लंडनमध्ये वास्तव्य आहे. कसुरे यांचा यापूर्वी 'गोष्ट तुझी माझी' हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे.

पुस्तकाविषयी थोडक्यात....
'संवादाक्षरे' हा थोडक्यात 'ती' आणि 'तो' मधील संवाद. त्यातुन घडणारं प्रबोधन, निघणारा निष्कर्ष आणि संवादातून मिळणारा अलौकिक आनंद..! 'ती' आणि 'तो' कोण, हे सर्वस्वी वाचकांनी ठरवायचं. या पुस्तकाची भाषा ही संपूर्णपणे मराठी नसून, ती आजची मराठी बोली भाषा आहे. त्यामुळे पुस्तकात बरेचसे इंग्रजी शब्द/वाक्य आहेत. या भाषेला नावच द्यायचं झाल्यास ती 'मार्लीश' भाषा म्हणता येईल. 'मार्लीश' म्हणजे मराठी आणि इंग्लिश यांचे मिश्रण.

लेखकाविषीय थोडक्यात...
सारंग जयंत कुसरे हे मुळचे नागपूरचे. कामानिमित्त लंडन येथे त्यांचे वास्तव्य असून, ERP consultant आहेत. 'संवादाक्षरे' हे त्यांचे दुसरे पुस्तक. यापुर्वी त्यांचा 'गोष्ट तुझी माझी' हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. 'Poetically तुमचाचं' या माध्यमातून त्यांचे कविता वाचनाचे काही प्रयोग मी लंडन, लेस्टर, स्लाव येथे झाले आहेत. भारतात पुणे आणि नागपूर येथे प्रयोग केले आहेत. युरोपियन मराठी संमेलन 2016, अलेमेलो नेदरलँड व लंडन मराठी संमेलन 2017 येथे त्यांनी काही कविता सादर केल्या आहेत. लंडन मराठी संमेलनमध्ये त्यांनी एक पोवाडा रचला होता. शिवाय, NuSound Radio 92 FM, London येथे कविता वाचनाचे 1 तासाचे दोन कार्यक्रम केले आहेत.

कसुरे यांचे youtube channel असून तेथे ते कविता वाचन करीत असतात. त्यांच्या facebook page वरून facebook live च्या माध्यमातून कवितांचे वाचन करतात. गेल्या वर्षी 'कविताष्टक' या आठ ओळींच्या आठ कवितांचे दर आठवड्याला एक कविता या प्रमाणे सलग आठ आठवडे facebook live वरून वाचन केले होते. या उपक्रमाला नेटिझन्सचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
 
संपर्कः
सारंग कुसरे
kusaresarang@gmail.com किंवा poeticallytumchach@gmail.com

पुस्तकाची amazon वरची link पुढीलप्रमाणे-
https://www.amazon.com/dp/B072R5VDKH