esakal | अनुभव सातासमुद्रापारचे... : ना अकारण बाऊ, ना व्यवहारांना खीळ
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka-Jadhav

इटलीच्या शेजारचा देश असल्यामुळे कोरोनाच्या विळख्यात स्वित्झर्लंडही होता. पर्यटकांना खुणावणारा हा देश.  उच्च शिक्षणासाठी या देशाची निवड विद्यार्थी करतात. त्यामुळे कोरोनाच्या प्रसाराची भीती प्रत्येकाच्याच मनात होती. पण मुळातच स्वच्छताप्रिय व स्वयंशिस्त असल्यामुळे या देशाने कोरोनाला बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवले. त्यामुळे रुग्णांची संख्या कमी होताना दिसते आहे. मी राहते झुरीक शहरात. सुरक्षित आहोत आम्ही येथे. या देशात २५  फेब्रुवारीला ७१ वर्षीय पहिला कोरोनाबाधित  रुग्ण सापडला.

अनुभव सातासमुद्रापारचे... : ना अकारण बाऊ, ना व्यवहारांना खीळ

sakal_logo
By
प्रियांका जाधव-गिराम, स्वित्झर्लंड

इटलीच्या शेजारचा देश असल्यामुळे कोरोनाच्या विळख्यात स्वित्झर्लंडही होता. पर्यटकांना खुणावणारा हा देश.  उच्च शिक्षणासाठी या देशाची निवड विद्यार्थी करतात. त्यामुळे कोरोनाच्या प्रसाराची भीती प्रत्येकाच्याच मनात होती. पण मुळातच स्वच्छताप्रिय व स्वयंशिस्त असल्यामुळे या देशाने कोरोनाला बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवले. त्यामुळे रुग्णांची संख्या कमी होताना दिसते आहे. मी राहते झुरीक शहरात. सुरक्षित आहोत आम्ही येथे. या देशात २५  फेब्रुवारीला ७१ वर्षीय पहिला कोरोनाबाधित  रुग्ण सापडला. तो इटलीमधील मिलान या शहरातून आला होता. तोवर मिलानमधील साथीच्या भयानकतेची कल्पना शेजारच्या देशातही फारशी नव्हती. पण कल्पना आल्यानंतर लगेच इटलीच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या. सर्व विमानांचे पंख मिटले. जसजशी रुग्णांची संख्या वाढत गेली तसे वर्क फ्रॉम होम चालू केले गेले. त्याआधी शाळा बंद  करण्यात आल्या. पण पूर्णपणे लॉकडाउन नव्हता. अगदी आजही पूर्णपणे  संचारबंदी नाही या देशात. सार्वजनिक वाहतूक सुरू आहे. लोकल ट्रेन, बसगाड्या नियमित धावत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

साथीला रोखण्यासाठी साधारण सोळा मार्चला इमर्जन्सी लॉकडाउन जाहीर करण्यात आला.  त्यामुळे सुरुवातीला लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यातूनच सर्वसामान्यांकडून खाद्यपदार्थांची साठेबाजी झाली. जागोजागी गर्दी उसळली होती. पण ग्रॉसरी शॉप व औषधांची दुकाने चालू राहणार असल्याचे सांगितले गेल्यानंतर दुकानांमधील गर्दी ओसरू लागली. अस्वस्थता कमी झाली. मुळातच निसर्गसंपन्न असा हा देश असल्यामुळे इथले लोक ट्रेकिंग, स्विमिंगचा आनंद घेणारे आहेत. पण आता करोनामुळे कुठेतरी यावर मर्यादा आल्या आहेत. पण लोकांचे मनोधैर्य वाढवणारे नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत. वर्क फ्रॉम होमच्या कॉन्फरन्स कॉलमध्ये रोज दहा मिनिटे प्रार्थना म्हटली जाते. शाळा बंद आहेत, पण तरीही मुलांशी ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून संवाद साधला जातो. ईस्टर दिवशी तर ईस्टर बास्केटमधून मुलांना खाऊ चॉकलेट  घरपोच दिले गेले. वयोवृद्धांसाठी घरपोच सामानाची व्यवस्था आहे. आई-वडील दोघेही काम करतात व ज्यांची मुले लहान आहेत, त्यांसाठी डे केअर सारखी सुविधा दिली गेली आहे . प्रत्येक ठिकाणी सोशल डिस्टन्सचे पालन होते.

दुकानांमध्ये आवश्यक तिथे सॅनिटायझर ठेवले आहेत. बिलिंग काऊंटरजवळ ठराविक अंतर ठेवून खुणा करून ठेवल्या आहेत. दुकानांसाठी ठराविक वेळ दिली गेली आहे. आवश्यक ती काळजी घेतली जात आहे, पण अकारण बाऊ केला जात नाही. सर्वच बाजूंनी पद्धतशीरपणे करोनाविरुद्ध सशक्तपणे  लढाई लढली जाते आहे व्यवहारांना खीळ न घालता.
(शब्दांकन - संतोष शेणई)