esakal | H-1B चे उमटताहेत पडसाद
sakal

बोलून बातमी शोधा

H1B_visa

आपण एच1-बी व्हिसावर अमेरिकेत जॉब करत असाल, तर आपलेही अनुभव आमच्यापर्यंत पाठवा. ई मेल करा: webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहा : H-1B

H-1B चे उमटताहेत पडसाद

sakal_logo
By
वृंदा चांदोरकर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने 'एच-1बी' व्हिसा संदर्भातील धोरणात बदलासाठीचे विधेयक मंजूर केले. या नव्या प्रस्तावाचा फार मोठा फटका भारतातील आयटी कंपन्यांना बसणार असे चित्र उभे राहात आहे. वेगवेगळे अनुभव त्यानिमित्ताने आयटी क्षेत्रात येत आहेत. 

एक मित्र नामांकित आयटी कंपनीमध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहे. त्याच्या कंपनीत अचानक एक मिटिंग बोलविण्यात आली. कंपनीचे उपाध्यक्षच मिटिंग घेणार असल्याने सगळ्यांनी कॉलवर असणे आवश्यक असणार होते. मिटिंग सुरु झाली तेव्हा कंपनीच्या भावी धोरणांबरोबरच भारतात असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये असणारी सफाई, मनापासून काम करण्याची तयारी याचे कौतूक करताना अमेरिकेतील वेतनाच्या तूलनेत कमी वेतनामध्ये मिळणारे मनुष्यबळ असे सगळे मुद्दे मांडत अचानक त्यांनी पहिल्या टप्प्यात 350 तर दुसऱ्या टप्प्यात 13 महत्त्वाच्या पदांवरचे अमेरिकन कर्मचारी काढल्याची घोषणा केली. त्याऐवजी या कर्मचाऱ्यांची पदे भारतात असणाऱ्या कंपनीच्या शाखांमध्ये भरण्याचेही आदेश दिले. प्रत्यक्ष कोणताही उल्लेख न करता, भारतात कर्मचारी घेतल्याने होणारे कॉस्ट कटिंग आणि कामात मिळणारी लवचिकता हे मुद्दे समोर ठेवून असा निर्णय घेतल्याचे सांगितले गेले. परंतु, हा अचानक घेतलेला निर्णय म्हणजे 'एच-1बी' व्हिसा संदर्भातील नव्या धोरणांचा परिणाम असल्याची चर्चाही त्याच्या ऑफिसमध्ये रंगली. 

कॅलिफोर्नियामधील आयटी कंपनीत काम करणाऱया एकाची बायको गर्भवती आहे. त्याची बायको डिपेन्डंट व्हिसावर अमेरिकेत आहे. बायकोला वर्किंग व्हिसासाठी प्रयत्न सुरू आहेत. वर्किंग व्हिसा मिळण्याची शक्यता मावळत चाललीय. बाळाच्या आगमनासाठी भारतातून आई-वडीलांना बोलावयचे, तर त्यांचा व्हिसा होईल की नाही, याबद्दलही शंका. 'आमचाच व्हिसा राहिल की जाईल माहिती नाही...,' या आयटी इंजिनिअरची अशी द्विधा अवस्था. 

अमेरिकेत दरवर्षी सर्वसाधारणपणे 85 हजार इतके 'एच-1बी' व्हिसा दिले जातात. 2014 मध्ये 'एच-1बी' व्हिसा घेण्यात भारतीयांचे प्रमाण 86 टक्के इतके होते. ट्रम्प सरकारने व्हिसासंदर्भातील नियम कडक करण्यासाठी उचललेल्या पावलांचा सर्वाधिक फटका भारतीय कर्मचाऱयांना बसणार हे नक्की आहे. 

(आपण एच-1बी व्हिसावर अमेरिकेत जॉब करत असाल, तर आपलेही अनुभव आमच्यापर्यंत पाठवा. ई मेल करा: webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहा : H-1B)