
ढालगाव - येथील श्री बालगणेश मंडळाच्या वतीने गणेश उत्सव काळातील सात दिवसांत मुलगी जन्माला आल्यास पाच हजारांची ठेव ठेवण्यात येणार असून याचे पहिले मानकरी सौ. राणी संतोष गडदे या ठरल्या आहेत.
ढालगाव - येथील श्री बालगणेश मंडळाच्या वतीने गणेश उत्सव काळातील सात दिवसांत मुलगी जन्माला आल्यास पाच हजारांची ठेव ठेवण्यात येणार असून याचे पहिले मानकरी सौ. राणी संतोष गडदे या ठरल्या आहेत.
ढालगावचे श्री बाल गणेश मंडळ हे विविध सामाजिक कार्यात भाग घेत असून समाजासाठी बांधिलकी या भावनेतून त्यांची प्रत्येक वर्षी वाटचाल सुरू आहे. गावात एक गाव एक गणपतीची संकल्पना त्यांनी गेली पंधरा वर्षे पाळली आहे. या कामी त्यांना पोलिस प्रमुखांकडून प्रथम क्रमांकाचा पुरस्कारही देण्यात आला आहे. यावर्षी मंडळाने गणेश मंडपाजवळ झाडे लावा, झाडे जगवा, मुलगी वाचवा, स्वच्छता अभियान यासारखे फलक लावून जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तर याच वर्षापासून मंडळाकडून सात दिवस गणेश उत्सव काळात मुलगी जन्माला आल्यास मुलीच्या नावे पाच हजार रुपयांची ठेव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुलगी झालेल्या राणी संतोष गडदे यांना यावर्षी पहिला मान मिळाला आहे. त्यांच्या मुलीच्या नावे पाच हजारांची ठेव ठेवण्यात येणार आहे. मंडळाने आतापर्यंत पूरग्रस्तांना मदत, जळीतग्रस्तांना मदत, घरे पडलेल्यांना मदत करणे, अशा प्रकारचे उपक्रम राबविले आहेत.
यावर्षी रक्तदान शिबिर घेण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी (ता. ३०) ढालगाव येथे सावित्री मंगल कार्यालयात रक्तदान शिबिर घेतले आहे.