'मंथन'ने घडवले मोहक नृत्यदर्शन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

बेळगाव : बेळगावच्या स्थानिक कलाकारांना वाव मिळत नाही, त्यांची कला पाहण्यासाठी अपेक्षित गर्दी होत नाही, हा समज खोटा ठरवणारा बहारदार नृत्यसोहळा आज मंथन ग्रुपने सादर केला. गणेश फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी या 'मंथन'च्या नृत्यानंद या कार्यक्रमाला बेळगावकर रसिकांनी भरभरुन दाद दिली. 

प्रारंभी गणेशावर आधारित गाण्यांवर मुलांनी नृत्य सादर केले. त्यानंतर हिंदी, मराठी गाण्यावर नृत्य सादर करून मुलांनी बेळगावकरांची मने जिंकली. 'बजने दे ढोल ताशे' या बाजीराव-मस्तानी चित्रपटातील गाण्यावर नृत्य सादर करताना प्रेक्षक शिट्या वाजवत होते.

'काठी अन्‌ घोंगड घेऊ द्या की रे'.. या रिमिक्‍स गाण्याला 'वन्स मोअर' मिळाला. 'नटले मी तुमच्यासाठी' यासारख्या लावण्यांनी रसिकांना ताल धरण्यास लावले. 

वाङमय चर्चा मंडळच्या सभागृहात सुरू असलेल्या गणेश फेस्टिवलच्या आजच्या दुसऱ्या दिवशी नृत्यानंद सादर झाला. गणेश मूर्तीचे पूजन राजमाता सोसायटीच्या उपाध्यक्षा प्रतिभा नेगिनहाळ, भक्ती महिला सोसायटीच्या संचालिका डॉ. तेजस्वीनी पाटील यांनी केले. मंथन डान्स ग्रुपचे संचालक राहूल लोहार, संगिता लोहार यांचा गौरव करण्यात आला. मंथन ग्रुपने पहिल्यांदाच अशा प्रकारचा कार्यक्रम सादर केला आणि तो प्रेक्षकांनी डोक्‍यावर घेतला. त्यामुळे स्थानिक कलाकारांनाही स्थानिक रसिकांकडून दाद मिळते, हे सिद्ध झाले. कार्यक्रमाला विविध संस्थाचे पदाधिकारीही उपस्थित होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival 2017 Kolhapur Ganesh Utsav