डॉल्बी लावल्याने 43 जणांवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

शिरोळ : शिरटी ता. शिरोळ येथे चार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीमध्ये डॉल्बी लावून ध्वनिप्रदूषण केल्याने कार्यकर्त्यावर सौम्य लाठीचार्ज केला गेला. वेळेचे उल्लंघन केल्याने 43 कार्यकर्त्यावर शिरोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

शिरोळ : शिरटी ता. शिरोळ येथे चार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीमध्ये डॉल्बी लावून ध्वनिप्रदूषण केल्याने कार्यकर्त्यावर सौम्य लाठीचार्ज केला गेला. वेळेचे उल्लंघन केल्याने 43 कार्यकर्त्यावर शिरोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

अमोल ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पूर्व गावठाण गणेशोत्सव मंडळ, नवशक्‍ती तरुण मंडळ, स्वाभिमानी गणेश मंडळ या चार मंडळांनी काल मिरवणूक काढली. भैरेश्‍वर मंदिराजवळील सार्वजनिक रस्त्यावर मिरवणुका आल्या असता एकमेकांच्या ईर्ष्येवर साउंड सिस्टीमचे आवाज वाढविले. तसेच हुल्लडबाजी सुरू झाली. पोलिसांचे शांतता राखण्याचे आवाहन धुडकावून हुल्लडबाजी सुरू केली. अखेर शिरोळहून जादा पोलिसांची कुमक मागविली. 

पोलिस निरीक्षक उदय डुबल, सहायक पोलिस निरीक्षक समीर गायकवाड, उपनिरीक्षक पूनम रुग्गे, सहायक फौजदार चळचुक, पटेल, आर. व्ही. धुमाळ, भुजिंग कांबळे, सागर पाटील, यशवंत पुजारी, अमित पवार यांनी लाठीचार्ज करीत हुल्लडबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पांगवले. 

यांच्यावर केले गुन्हे दाखल 
अभिजित शिरगावे, निखिल चौगुले, विपुल शिरगावे, सौरभ चौगुले, शुभम पाटील, नितीन चौगुले, रोहित चौगुले, विशाल चौगुले, संजय चौगुले, भुजबली चौगुले, अक्षय माळी, कीर्तीकुमार सूर्यवंशी, संतोष चौगुले, रोहित सूर्यवंशी, दिनेश चव्हाण, निखिल माळी, अनिकेत चौगुले, श्रेयवंश पाटील, मनोज पाटील, सूरज चौगुले, अविनाश भोसले, अजित माळी, शांतिनाथ पाटील, भरत पाटील, दिगंबर हुग्गे, संदीप सुतार, विनायक सुतार, राहुल सुतार, दीपक सुतार, अवधूत सुतार, वृषभ चौगुले, वृषभ कोगनोळे, पंकज परीट, महावीर आरवाडे, प्रशांत पाटील, नेहाल कुंभार, बाबासो चौगुले, अमोल रोजे, सुनील पाटील, बंडू पाटील, अनिल रोजे, सुनील पाटील व प्रवीण पाटील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival 2017 Kolhapur Ganesh Utsav