विट्यात आज महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

विटा : विट्याचा राजा गणेश मंडळाच्यावतीने उद्या (ता. 3) दुपारी तीन वाजता महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आल्याची माहिती जि.प.चे उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली. 

यावर्षी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सुमारे 121 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले आहे. तसेच आयोजित केलेल्या गौरी-गणपती आरास सजावट स्पर्धेस मोठा प्रतिसाद मिळाला आहे, या स्पर्धेचे परीक्षण पूर्ण झाले आहे.

रविवारी हळदी-कुंकू नंतर भाविकांसाठी महाप्रसाद आहे. यावर्षीच्या विसर्जन मिरवणुकीचे कर्नाटकचे प्रसिद्ध असणारे वाद्य चेंदामेलमचे बंगळूरचे श्री रागा ग्रुप पथक हे खास आकर्षण आहे. तसेच मिरवणुकीत मर्दानी खेळांचे व मल्लखांब पथक देखील आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival 2017 Kolhapur Ganesh Utsav