गणेशोत्सवात डॉल्बी लागला तर पोलिस कडक कारवाई करणार

सचिन शिंदे
Wednesday, 30 August 2017

डॉल्बी लावला की त्यांच्या कारवाई केली जाते. यापेक्षा वेगळे काहीही केले जात नाही. त्यामुळे आजही डॉल्बीचे गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहेत.

कऱ्हाड : शहरासह मलकापूर व लगतच्या भागात गणेशोत्सवात डॉल्बी लागला तर पोलिस कडक कारवाई करणार आहेत. डॉल्बीवर कारवाईसाठी तशी सज्जड तयारी केली आहे. पोलिसांची तीन पथके तीन मशिनद्वारे त्याची तपासणी करणार आहेत. अमंलबजावणी अत्यंत काटोकोरपणे होणार आहे. त्याचाच भाग म्हणून उत्सवात आलेले दोन डॉल्बी पोलिसांनी काल जप्त केले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रीया सुरू आहे. त्यामुळे उत्सव कालवधीसह विसर्जन मिरवणुक नो डॉल्बी पोलिसांचा नारा मंडळांना यंदा डॉल्बीचा आवाज खाली ठेवावा लागले, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

डॉल्बी लावू नका, असा पोलिसांचा दरवर्षीचा आग्रह यंदा मात्र प्रत्यक्षात कारवाईत रूपांतरीत होताना दिसतो आहे. उत्सव काळात आलेले दोन डॉल्बी पोलिसांनीजप्त केले आहेत. त्यामुळेयापुडच्या काळात गणोशोत्सवात डॉल्बी लावणारावर पोलिस ककडक कारवाई करणार आहेत. त्यासाटी पोलिस उपाधीक्षक नवनाथ ढवळे, पोलिस निरिक्षक प्रमोद जाधव यांनी जय्यत तयारी केली आङे. शहरात ३६५ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. त्यात सांयकाळी निघणाऱ्या मिरवणुकात सर्रास डॉल्बीचा वापर होतो. किंबहुना येथे तसा शिरस्ताच दिसतो. काही त्या मंडळांना पोलिस तापदायक गणेश मंडळांच्या यादीत टाकून रिकामे होतात. डॉल्बी लावला की त्यांच्या कारवाई केली जाते. यापेक्षा वेगळे काहीही केले जात नाही. त्यामुळे आजही डॉल्बीचे गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहेत. पोलिसांनी गतवर्षी डॉल्बी लावू नका, असे जाहीररीत्या सांगितले होते. तरीही दहापेक्षा जास्त मंडळांनी डॉल्बीचा दणदणाट केल्याचे वस्तूस्थिती आहे. सायंकाळी निघणाऱ्या मंडळांच्या डॉल्बीच्या दणदणाटापुढे पोलिस खातेही काही करू शकले नव्हते. यंदा मात्र पोलिस डॉल्बीच्या विरोधात चांगलाच जोर धरला आहे. पोलिसांनी यंदा डॉल्बीच्या विरोधात चांगलीच अक्शन घेतल्याचे तुर्ततरी दिसतो आहे. प्रत्येक मंडलाला डॉल्बी न लावण्याचा आग्रह व बंधन पोलिसांनी घातले आहे. परवागी देतानाच पोलिसांनी नो डॉल्बी अशा नारा देत त्यांना परवानगी दिली आहे. 

मोठ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थीतीत दोन मोठ्या बैठका झाल्या. त्यातही पोलिसांनी थेट सज्जड इशारे दिले आङे. त्याचा परिणाम गणेश आगमनावेळी दिसला. डॉल्बीला फाटा दिलेल्या मंडळांचे पोलिसांनी स्वागत केले. मात्र आता उत्सव काळात व विर्सजनावेळी तो शिरस्ता कायम ठेवण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. उत्सव काळात नसला तरी डॉल्बीचा दणदणाट अनंत चतुर्दशीला नक्कीच अनुभवयास मिळणार असे वातावरण आहे. त्याला तोंड देण्यासाठी तीन वेगवेगळे पथक तयार केलेआङेत. त्या प्रत्येक पथकाकडे डॉल्बी तपासणारी एक यंत्रणा दिली आहे. त्यांनी केवळ डॉल्बी कारवाईचे अधिकार दिले आहेत. थेट गुन्हा दाखल करणे, डॉल्बी जप्त करणे व प्रसंगी मंडळांची परवानगी रद्दचा प्रस्ताव देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा पोलिसांची बुमिका अत्यंत कडक आहे. त्यावर मंडळांची काय रिअक्शन येणार त्यावर सर्व काही अवंलंबून आहे. 

यंदा तीन पथकाद्वारे डॉल्बीवर नियंत्रण ठेवण्यासाची पोलिस आक्रमक झाले आहेत. मंडलांनीही डॉल्बी न लावता त्यात सहकार्य करण्याचे आवाहन आम्ही केले आहे. त्यामुळे डॉल्बीशिवाय मिरवणुका निघतील, अशी आणची अपेक्षा आहे.
- प्रमोद जाधव, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, कऱ्हाड शहर 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2017 satara news karad police against dolby