ऍप डाउनलोड करणे पडले महागात ; पार्सल देण्याचा केला बहाणा, साडेसहा हजारांना गंडा 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 October 2020

डाउनलोड केल्यानंतर एटीएम कार्ड क्रमांक, कालबाह्य दिनांक यासह सारी माहिती भरून घेतली.

सांगली : पार्सल देण्याचा बहाणा करत मोबाईलवर ऍप डाउनलोड केल्यानंतर साडेसहा हजारांना गंडा घालण्यात आल्याची घटना उघडकीस आली.याप्रकरणी अज्ञाताविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीपात रामचंद्र ओगले (वय 62, बुधवार पेठे, माधवनगर) यांनी फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : 

श्रीपात ओगले यांना काल दुपारी एकच्या सुमारास अज्ञाताचा फोन आला. त्यानंतर त्याने ओगले यांना तुमचे पार्सल थाबविण्यात आल्याचे सांगितले. ते परत पाठविण्यासाठी 10 रूपये ऑनलाइन भरावे लागतील अशी बतावणी केली. त्यानंतर ऍनिडिस्क हे ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करण्यास सांगितले.

हेही वाचा- आता कोरोना चाचणी टाळल्यास  होणार पाच वर्षाची शिक्षा -

डाउनलोड केल्यानंतर एटीएम कार्ड क्रमांक, कालबाह्य दिनांक यासह सारी माहिती भरून घेतली. त्यानंतर बॅंक खात्यातून पहिल्यांदी 5997 रूपये काढून घेतले. त्यानंतर पुन्हे सहाशे रुपये काढले. फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.पोलिसांनी अज्ञाताविरोधात फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पोलिस अधिक तपास करत आहेत. 

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After downloading fill in all the information including ATM card number expiration date case in sangli