प्रो खो खो लिगची दिल्लीत जोरदार तयारी; भारतीय खो खो महासंघाचा मोठ्या ताकदीने सराव

महादेव अहिर
Monday, 8 February 2021

कबड्डीच्या धरतीवर दिल्लीत होणाऱ्या प्रो खो खो लिगची तयारी भारतीय खो खो महासंघ मोठ्या ताकदीने करीत आहे.

वाळवा (जि. सांगली) ः प्रो कबड्डीच्या धरतीवर दिल्लीत होणाऱ्या प्रो खो खो लिगची तयारी भारतीय खो खो महासंघ मोठ्या ताकदीने करीत आहे. ही स्पर्धा जागतिक स्तरावर नावाजली जावी आणि या खेळातील भारतीय टॅलेंट जागतिक क्रिडा क्षेत्रासमोर यावे म्हणून खो खो महासंघ प्रयत्नशील आहे. त्यासाठी नवनवीन कौशल्य अवगत असलेल्या खेळाडूंना मैदानात उतरता यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

या लीगच्या पार्श्वभूमीवर दोन राष्ट्रीय खो खो स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्यानुसार येत्या मार्च आणि एप्रिलमध्ये या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. मार्च महिन्यात चौथ्या आठवड्यात महाराष्ट्रातील उस्मानाबाद येथे खो खो ची राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यात दुसऱ्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेचा थरार दिल्लीत पहायला मिळेल. या दोन स्पर्धांत विशेष कामगिरी नोंद करणा-या खेळाडूंची प्रो खो खो लीग साठी निवड केली जाईल. निवड झालेल्या खेळाडूचा येत्या जून महिन्यात लिलाव होईल. 

प्रो खो खो लीग स्पर्धेसाठी विविध मान्यवराचे संघ असतील. जून महिन्यात संघ निवड झाल्यानंतर या खेळाडूंचा सप्टेंबर अखेर दिल्लीत सराव होईल. त्यासाठी सगळा खर्च भारतीय खो खो महासंघ करणार आहे. गेल्या महिन्यात प्रो खो खो साठी प्रदर्शनीय सामना झाला होता. हरियाणा राज्यातील गुरूग्राम येथे झालेल्या या सामन्याला केद्रीय क्रिडा राज्य मात्र किरण रिजीजू, क्रिकेट खेळाडू सुरेश रैना, महम्मद शमी यांच्या सह खो खो महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

दिल्लीत सराव सुरू 
सध्या प्रो खो खो लीगच्या पाश्वभूमीवर देशातील विविध राज्यातील नामवंत खो खो पटू दिल्लीत सराव करत आहेत. उस्मानाबाद आणि दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धान×तर प्रो खो खो लीगच्या रोमहर्षक लढती क्रिडा रसिकांना पहायला मिळणार आहेत. 

संपादन :  युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pro Kho Kho League preparations in Delhi; The Indian Kho Kho Federation practiced with great vigor