
सरकार समाजाला गृहीत धरत आहे. मुस्लिम समाजाचे 5 टक्के आरक्षण जे कोर्टाने मान्य केले आहे ते तरी द्या. - राधाकृष्ण विखे पाटील
अहमदनगर - 'सरकारने सत्तेत आल्यानंतर अनेक घोषणा केल्यात. धनगर समाजाला देण्याचे सरकारने आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही याबाबत कारवाई नाही.' असे मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र बंद च्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले आहे. तसेच सरकार आंदोलनात फूट पाडत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले, 'सरकार समाजाला गृहीत धरत आहे. मुस्लिम समाजाचे 5 टक्के आरक्षण जे कोर्टाने मान्य केले आहे ते तरी द्या. मराठा आंदोलन करणाऱ्या सर्वांनी एकत्र यावे आणि सरकारवर दबाव आणला पाहिजे. आंदोलन बदनाम करण्यासाठी समाजकंटकांकडून जाळपोळ केली जात आहे. सरकारने आंदोलनकर्त्यांवर जे गुन्हे दाखल केले आहे ते मागे घ्यावे.'
'मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीला येऊ नये म्हणून मराठा समाजाची मागणी होती. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी साप सोडण्याचे वक्तव्य करून समाजाची अवहेलना केली असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.'
आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.