#MarathaKrantiMorcha कोल्हापूरातील दसरा चाैकमधील आंदोलनास वाढता पाठींबा

संदीप खांडेकर
Monday, 6 August 2018

कोल्हापूर - मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या भ्रष्ट सरकारच्या विरोधात शंखध्वनी करत सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला नाल्यातील पाण्याचा अभिषेक करण्यात आला. आंदोलनकांनी यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. गेल्या काही दिवसांपासून दसरा चाैक येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे.

मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी दसरा चाैक परिसर दणाणून गेला होता. आजच्या आंदोलनामध्ये पाटाकडील तालीम मंडळासह कुशिरे, पोहाळे, भुये या गावातील मराठा बांधवांनी सहभाग घेत पाठींबा व्यक्त केला. दरम्यान, यावेळी कणेरीवाडीतील आत्महत्या केलेल्या युवकाला श्रद्धांजली वाहण्यात आली.

आज शहरातही विविध ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले. मंगळवार पेठ परिसरातील मराठा बांधव आज रस्त्यावर उतरले. त्यांनी मिरजकर तिकटी परिसरात मानवी साखळी करत रास्ता रोको केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morch agitation for Maratha Reservation