झरे, जि. सांगली - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी झरे व घरनिकी गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. अखिल भारतीय मराठा सेवा संघ व मराठा क्रांती मोर्चा व ग्रामस्थांच्यावतीने बंद पाळण्यात आला .
झरे, जि. सांगली - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी झरे व घरनिकी गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. अखिल भारतीय मराठा सेवा संघ व मराठा क्रांती मोर्चा व ग्रामस्थांच्यावतीने बंद पाळण्यात आला .
परिसरातील झरे व घरनिकी येथे बाजारपेठेतील व्यवहार ठप्प होते. या दोन्ही गावामध्ये आज सकाळपासूनच बंद पाळण्यात आला. झरे येथे मोर्चा काढून सभा घेण्यात आली. झरेत दवाखाना, मेडिकल, विद्यालय वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प होते. या मोर्चामध्ये अखिल भारतीय मराठा सेवा संघ व मराठा क्रांती मोर्चा यांचे कार्यकर्ते सहभागी झाली होते. सभेमध्ये महादेव जुगदार, भाऊसाहेब घोरपडे, नारायण पाटील, शरद पवार, बंडू (कतुरे)पाटील, अजित कदम व ग्रामस्थ उपस्थित होते