Maratha Kranti Morcha : आरक्षणातूनच मराठा समाजाचा विकास - धनंजय महाडिक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - मराठा समाजातील तरुण-तरुणींना पुरेशा नोकऱ्या नाहीत. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क परवडत नाही. त्यामुळे शिक्षण आणि नोकरीत मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. आरक्षणामुळे मराठा समाजाचा विकास होणार आहे, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. छत्रपती शिवाजी चौकात सुरू असणाऱ्या शौर्यपीठ ठिय्या आंदोलनात ते बोलत होते.

सकल मराठा समाज शौर्यपीठतर्फे छत्रपती शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे. खासदार महाडिक यांनी या आंदोलनाला आज भेट दिली. मराठा समाजाच्या मागणीला पाठिंबा व्यक्त करून त्यांनी आरक्षणाविषयी भूमिका मांडली.

या वेळी महापालिका विरोधी पक्षनेते विलास वास्कर, नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, चंद्रकांत बराले, प्रसाद जाधव, राजू जाधव, जयदीप शेळके, महेश कुलकर्णी, हिंदूराव शेळके, अक्षय घाटगे, दीपाताई पाटील, गायत्री राऊत, सुजाता चव्हाण आदींनी उपस्थित होते.

लोकसभेत पहिल्यांदा मागणी
श्री. महाडिक म्हणाले, की मराठा आरक्षण मिळावे, ही मागणी सर्वांत पहिल्यांदा लोकसभेत आपण केली. कारण मराठा समाजातील सर्वसामान्य माणसाची व्यथा आपण सर्वच जण जाणतो आहोत. मराठा तरुण-तरुणींना पुरेशा नोकऱ्या नाहीत. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क त्यांना परवडत नाही. मराठा समाजातील श्रीमंत लोकांना जरी आरक्षणाची गरज नसली, तरी सर्वसामान्य लोकांना आहे. त्यामुळे शिक्षण आणि नोकरीत मराठा समाजाला आरक्षण मिळणे आवश्‍यक आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maratha kranti morcha maratha reservation agitation Development Dhananjay Mahadik