#MarathaKrantiMorcha मराठा अरक्षणासाठी ३० जुलै रोजी अक्कलकोट बंदचे आवाहन

राजशेखर चौधरी
Sunday, 29 July 2018

अक्कलकोट : सकल मराठा समाज यांच्या वतीने मराठा समाजास स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्यावे या मागणीसाठी सोमवारी (ता.३० जुलै) अक्कलकोट बंदचे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने आज शनिवारी आयोजित बैठकीत करण्यात आले आहे. सर्जेराव जाधव सभागृहात सकल मराठा समाजाची बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.  सोलापूर जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर जन्मेजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल भोसले व नगरसेवक महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली  सदरच्या बैठकीस मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. या बैठकीत सकल मराठा समाजास आरक्षण व अन्य मागण्यासाठी राज्यात शांततापूर्ण ५८ मोर्चा काढण्यात आले.

अक्कलकोट : सकल मराठा समाज यांच्या वतीने मराठा समाजास स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्यावे या मागणीसाठी सोमवारी (ता.३० जुलै) अक्कलकोट बंदचे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने आज शनिवारी आयोजित बैठकीत करण्यात आले आहे. सर्जेराव जाधव सभागृहात सकल मराठा समाजाची बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.  सोलापूर जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर जन्मेजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल भोसले व नगरसेवक महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली  सदरच्या बैठकीस मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. या बैठकीत सकल मराठा समाजास आरक्षण व अन्य मागण्यासाठी राज्यात शांततापूर्ण ५८ मोर्चा काढण्यात आले. परंतु सरकार अद्याप याबाबत निर्णय घेत नसल्याने शासनाला जाग आणण्यासाठी सोमवारी अक्कलकोट बंदचे आवाहन करण्यात आले. या बंदमध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी होणार आहेत.

दरम्यान अक्कलकोट तालुक्याचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी आंदोलनास पाठिंबा दिल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले व ते स्वत: अक्कलकोट बंदच्या मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगितले. यापूर्वी झालेल्या आंदोलनात सर्वपक्षीय नेते इतर समाजाचे समाज बांधव देखील सहभागी झाले होते. या बरोबरच सर्व व्यापारी बंधूंनी देखील आंदोलनास सहकार्य केले आहे. या बंदमध्ये अक्कलकोट शहर व तालुक्याचा समावेश आहे, असे समाजाच्यावतीने प्रसिध्दी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
यावेळी उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवानराव निंबाळकर, एस.टी.आगार व्यवस्थापक व व्यापारी आणि बागवान असोसिएशन, जिप व रिक्षा चालक-मालक संघटना, शाळा, महाविद्यालय आदींना निवेदन देण्यात आले. यावेळी अमोल भोसले, नगरसेवक महेश इंगळे हे स्वत: फिरुन बंदचे आवाहन करुन निवेदन सादर केले आहे. 

याप्रसंगी बाबासाहेब निंबाळकर, अरुण जाधव, बाळासाहेब मोरे, विक्रम शिंदे, बंडोपंत घाटगे,  राम जाधव, तम्मा शेळके, सुभाष गडसिंग, दिलीप काजळे, मनोज गंगणे, मनोज इंगुले, शितल फुटाणे, बाळासाहेब घाटगे, संदीप केत, मंगेश फुटाणे, केदार तोडकर, सुरेश कदम, ज्ञानेश्वर भोसले, अंबादास जाधव, योगेश पवार, सागर शिंदे, विशाल गव्हाणे, सागर गोंडाळ, संतोष भोसले, प्रविण घाडगे, गणेश भोसले, नाना मोरे, प्रशांत साठे, चेतन शिंदे, गोविंद शिंदे-माकणे, राजु शिंदे, सुखदेव चव्हाण आदी उपस्थित होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #MarathaKranti Morcha Akalkot bandh appealed for maratha resevation on 30th July