#MarathaKrantiMorcha आमदार दिलीप सोपल यांच्या निवासस्थानाबाहेर लाक्षणिक उपोषण. 

सुदर्शन हांडे
Monday, 6 August 2018

बार्शी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी बार्शी येथील आप्पासाहेब पवार व त्याचे सहकाऱ्यांनी बार्शीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांच्या निवासस्थाना बाहेर लाक्षणिक उपोषण केले. 

बार्शी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी बार्शी येथील आप्पासाहेब पवार व त्याचे सहकाऱ्यांनी बार्शीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांच्या निवासस्थाना बाहेर लाक्षणिक उपोषण केले. 

मराठा समाजाची स्थिती हालाकीची झालेली आहे. नोकाऱ्या मिळत नाहीत, शिक्षण घेणे ही मुश्किल झाले आहे. यामुळेच मराठा समाज मागील ३० वर्षांपासून आरक्षण मागत आहे. मागील दोन वर्षात मराठा समाजाने जगाच्या इतिहासात नोंद झालेले लाखोंचे ५८ मोर्चे काढले. समाजाची मागणी शांतपणे, शिस्तीत मांडली पण शासनाने मराठा आरक्षणासाठी अद्याप निर्णय घेतलेला नाही. यासाठीच मराठा आरक्षणासाठी सर्वांनीच एकाच वेळी आवाज उठवणे आवश्यक असल्याची भूमिका मांडत आप्पासाहेब पवार यांनी सोमवारी (ता.६) सकाळी आमदार सोपल यांच्या निवासस्थानाबाहेर लाक्षणिक उपोषण केले. 

यावेळी संतोष सुर्यवंशी, धैर्यशील पाटील, गणेश भोळे, राजश्री डमरे-तलवाड, चंद्रकांत करडे, अजित कुंकूलोळ, शहाजी फुरडे-पाटील, प्रशांत काळे, मल्लिकार्जुन धारूरकर, एन. आर. कुलकर्णी, गोरख यादव, सुदर्शन हांडे, आदी उपस्थित होते. आमदार दिलीप सोपल यांनी उपोषणकर्त्याना भेट देऊन निवेदन स्विकारले. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही माझी पूर्वी पासूनची मागणी आहे. मी स्वतः मंत्री असताना राणे समितीच्या शिफारशी स्वीकारून तत्कालीन सरकारने मराठा समाजास आरक्षण दिले होते. ते आरक्षण न्यायालयात टिकले नाही. या सरकारने मराठा आरक्षणासाठी मागील चार वर्षात काहीही केले नाही. माझा आरक्षणासाठी केवळ पाठिंबाच आहे असे नसून माझा सहभाग, पाठबळ मराठा समाजाच्या मागे असे असे सांगितले. 

लाक्षणिक उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार दिलीप सोपल यांच्या निवासस्थाना बाहेर पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #MarathaKrantiMorcha fasting outside MLA Dilip Sopal's residence.