नेवासे : मराठा समाजाच्या अरक्षणासाठी व आमदारकीच्या राजीनाम्यासाठी भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची गाडी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते भाऊसाहेब वाघ व सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र महाले यांच्यासह अनेक तरुणांनी अडवली व मराठा अरक्षणासाठी आपण का गप्प आहात अशी जाहीर विचारणा केली

नेवासे शहरात शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आमदार बाळासाहेब मुरकुटे हे ३ तारखेच्या आंदोलनात सहभागी न झालेमुळे मराठा समाजामध्ये रोष निर्माण झाला. त्यामुळे आज सायंकाळीच्या सुमारास आमदार मुरकुटेची गाडी अडवली. तुम्ही मराठा समाजाचे नेतृत्व करत आहात. तुम्ही मराठा समाजासाठी राजीनामा देणार का? असा सवाल मराठा समाजचे कार्यकर्ते भाऊसाहेब वाघ यांनी विचारला. तसेच आमदार मुरकुटे यांना थांबवण्यासाठी गेलेला एक कार्यकर्ता जितेंद्र महाले हा फरफटत गेल्याने त्याचा पायाला दुखापत झाली.
यावेळी बोलतांना भाऊसाहेब वाघ म्हणाले, "नेवासे शहरात तसेच तालुक्यात मराठा अरक्षणासाठी अनेक आंदोलन झाली. रस्ता रोको ही झाले तसेच दोन दिवसांपूर्वी मराठा, धनगर व मुस्लिम समाजाचा अरक्षणासाठी ऐतहासिक मोर्चा निघाला या विषयात अजूनही आमदार मुरकुटे हे शांत आहे. मोर्चालाही आले नाही व नेवासा फाट्यावरील अरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या तरुणांना श्रद्धांजलीही त्यांनी वाहिली नाही.
दरम्यान मुरकुटे यांची गाडी आडवल्याने शहरात मोठी चर्चा झाल्याने नेवासे पोलिस ठाण्याचे पोलिस साह्ययक निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी आपल्या सहकार्यासोबत जाऊन घटना ठिकाणी जाऊन परिस्थिती नियंत्रणातं आणली
मराठा आमदारांना जाब विचारा - वाघ
मराठा समाजाच्या सर्व बांधवानी मराठा समाजाच्या प्रत्येक आमदारांची गाडी अडवून त्यांना जाब विचारावा असे आवाहन भाऊसाहेब वाघ यांनी केले.