9 ऑगस्टसाठी पोलिस पथकाची कसून तयारी...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 August 2018

9 ऑगस्टला मराठा समाजाचे संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता दंगली, आंदोलने, रास्ता रोको अशा घटना आटोक्यात आणण्यासाठी पोलिस यंत्रणेनेसह इतर आपत्तीकालीन यंत्रणांना वेळेत येऊन नियंत्रणात आणू शकते का? याचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

पांगरी - कुसळंब (ता. बार्शी) चौकात मोठी दंगल होऊन पोलिसांच्या प्रयत्नाने परिस्थिती नियंत्रणात आली होती. मोठा पोलिस बंदोबस्त, दंगा काबू पथकाची तुकडी, अग्निशामक दलाचे जवान, 108 रूग्णवाहिका, वायरमन, प्रतिष्ठीत ग्रामस्थ असा लवाजमा बार्शी-लातूर रस्त्यावर काल (ता. 6) सहा वाजेच्या सुमारास तैनात झाल्याने वातावरण तंग झाले होते.

रस्त्यावरून येणारी जाणारी प्रवासी मोठ्या उत्सुकतेने ही परिस्थिती पाहून घटनेची माहिती जाणून घेत होते. मात्र ही घटना होते 9 ऑगस्टला मराठा समाजाचे संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता दंगली, आंदोलने, रास्ता रोको अशा घटना आटोक्यात आणण्यासाठी पोलिस यंत्रणेनेसह इतर आपत्तीकालीन यंत्रणांना वेळेत येऊन नियंत्रणात आणू शकते का? याचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

नेहमीप्रमाणे आज बार्शी-लातूर, येरमाळा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुक चालू होती. मात्र कुसळंब चौकात मोठा पोलिस बंदोबस्तात बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षकसह 23 पोलिस कर्मचारी, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकरीसह तीन कर्मचारी, पांगरी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकरीसह आठ कर्मचारी, आरसीपी पथक, दंगा काबूत पथक, अग्निशामक दलाच्या गाड्या, रूग्णवाहिका, विद्युत वितरणचे कर्मचारी, पोलिस पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिसांच्या डोक्यावर हेल्मेट, हातात लाठी, संरक्षक जाळी समवेत कुसळंब गावातून संचलन (रूटमार्च) करण्यात आला.

त्यानंतर आज (ता. 7) सकाळी पांगरी गावातून पोलीसांनी उक्कडगाव चौक, जहानपूर चौक, बसस्थानक चौक, कारी चौक या दरम्यानच्या रस्त्यावरून संचलन (रूटमार्च) करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, हवालदार मोहन गायकवाड, अर्जुन कापसे, संदीप कवडे, मनोज भोसले, यांच्यासह रूग्णवाहिकेसह कर्मचारी उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MarathaKrantiMorcha Police Team is ready for nine august agitation