मराठा आरक्षणासाठी वाढेगाव येथील शांताबाई दिघे यांचा सरपंच पदाचा राजीनामा

दत्तात्रय खंडागळे
Friday, 27 July 2018

सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथील शांताबाई दिघे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. येथील ग्रामपंचायत सदस्य सचिन चौगुले यांनी ही आपल्या सदस्य पदाचा राजीनामा सरपंच कडे दिला आहे.  

संगेवाडी, जि. सोलापूर : संपुर्ण महाराष्ट्र सुरू असलेल्या मराठा आरक्षणावरून अनेक आमदार राजीनामा देत असतानाच सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथील शांताबाई दिघे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. येथील ग्रामपंचायत सदस्य सचिन चौगुले यांनी ही आपल्या सदस्य पदाचा राजीनामा सरपंच कडे दिला आहे.  

मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे व संपुर्ण महाराष्ट्र अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहेत. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे. यासाठी मराठा समाज वारंवार मागणी करूनही आरक्षण मिळत नसल्यामुळे याचा निषेध म्हणून ग्रामपंचायत सरपंच पदाचा राजीनामा सभापती यांच्याकडे देत असल्याचे राजीनाम्यात म्हटले आहे. याचदरम्यान वाढेगाव ग्रामपंचायत मधील ग्रामपंचायत सदस्य सचिन चौगुले यांनी ही आपल्या सदस्य पदाचा राजीनामा सरपंचकडे दिला आहे. यावेळी संभाजी इंगोले, मधुकर दिघे, सचिन चौगुले, इरफान मुलाणी, तानाजी भोसले, दादा दिघे, अशोक दिघे, दीपक दिघे, पिंटु पाटील यांच्यासह येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shantabai Dighes resignation from the post of Sarpanch for Maratha reservation