एमपीएससी, यूपीएससीत एकाचवेळी यश...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या शिवाजी विद्यापीठातील पहिल्या विद्यार्थिनी. एकाच वेळी एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेतून दोन नोकऱ्यांची संधी मिळाली आणि त्यांनी जाणीवपूर्वक देशाची भ्रमंती करता येईल, या उद्देशाने टपाल खात्यातील नोकरीला प्राधान्य दिले. नवी मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे यांच्याविषयी...

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या शिवाजी विद्यापीठातील पहिल्या विद्यार्थिनी. एकाच वेळी एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेतून दोन नोकऱ्यांची संधी मिळाली आणि त्यांनी जाणीवपूर्वक देशाची भ्रमंती करता येईल, या उद्देशाने टपाल खात्यातील नोकरीला प्राधान्य दिले. नवी मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे यांच्याविषयी...

वडील डेप्युटी कलेक्‍टर म्हणून निवृत्त झाले. त्यामुळे त्यांचं सारं शिक्षण महाराष्ट्राच्या विविध भागात झालं. दहावीचं अर्धं वर्ष प्रायव्हेट हायस्कूलमध्ये आणि पुढे न्यू कॉलेजला महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं. शिवाजी विद्यापीठात शिकत असताना स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली आणि एमपीएससी व यूपीएससी परीक्षेत १९९४ मध्ये एकाचवेळी यश मिळालं. विक्रीकर अधिकारी पोस्ट घेतली असती तर फक्त महाराष्ट्रातच नोकरी करावी लागली असती. त्यामुळे नोकरी करायची ती टपाल खात्यातच, असं ठरवलं होतं. त्यामुळे संपूर्ण देशभर काम करता येणार होतं.

कोची, त्रिवेंद्रम, दिल्ली, गुवाहाटी, मुंबई अशा अनेक शहरांत काम केलं. ईशान्येत काम केल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा यायची संधी मिळाली. मुंबई ‘जीपीओ’त पोस्ट मास्टर म्हणून काम केलं. या पोस्टवर काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या. त्यानंतर दिल्लीत पोस्ट मास्टर जनरल पदावर काम केले आणि आता नवी मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल या पदावर त्या कार्यरत आहेत. नोकरीसाठी अनेक राज्यांत राहण्याची, काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मुलांना मल्याळम, आसामी, हिंदी, संस्कृत या भाषा बोलता येतात. काही भाषा तर त्यांना व मुलांना जाणीवपूर्वक शिकाव्या लागल्या. त्यामुळे आता प्रत्येकाला सहा ते सात भाषा येतात.

त्या सांगतात, ‘‘कुणाच्याही मार्गदर्शनाशिवाय परीक्षा उत्तीर्ण झाले. पोस्ट मिळाल्यानंतरही देशभरात काम करण्याच्या संधीलाच अधिक प्राधान्य दिले आणि म्हणूनच ‘आम्ही भारतीय आहोत’ असे सांगताना अभिमान वाटतो. कारण ‘मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा’ हे अभिमानगीत माझ्यासाठी प्रेरणादायी होतं.’’

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news jagar strishakticha