अंबाबाई मंदिरात २० हजारांवर लाडू विक्री

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी श्री अंबाबाईची अष्टभुजा महासरस्वती रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. आज (ता. २५) ललिता पंचमीनिमित्त देवीची अंबारीतील गजारूढ पूजा बांधली जाईल. तुळजाभवानी देवीची रविवारी फलाहार घेणाऱ्या रूपातील पूजा बांधली. आज (ता. २५) देवीची झोपाळ्यातील पूजा बांधली जाईल. दरम्यान, मंदिरात भाविकांच्या प्रतिसादामुळे वीस हजारांवर प्रसादाच्या लाडूंची विक्री झाली.

 मी राधिका, मी प्रेमिका...
निर्माण चौक येथे रंगलेल्या नवऊर्जा उत्सवात अभिनेत्री सुरभी हांडेने ‘मी राधिका, मी प्रेमिका’ हे गीत सादर करून सर्वांचीच मने जिंकली. सुरभीसह अभिनेता विजय पाटकर, जयवंत वाडकर यांनी उत्सवाला भेट दिली. उत्सवात रविवारी एक लाखांवर भाविकांनी हजेरी लावली, अशी माहिती (कै.) भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे संस्थापक राहुल चिकोडे यांनी दिली. स्वाती गोखले, स्वयम्‌ मतिमंद मुलांची शाळा, सुबिया मुलाणी, पद्मिनी तेरदाळे, श्रुती गोखले यांचा सत्कार झाला. अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, बी. बी. यादव यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. मर्दानी कलाविशारद (कै.) आनंदराव पवार प्राचीन युद्धकला आखाडातर्फे शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके या वेळी सादर झाली. जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विश्‍वास पाटील, माजी महापौर वैशाली डकरे, नगरसेवक प्रताप जाधव, विजय खाडे, प्रताप कोंडेकर आणि मुंबईचे सहाय्यक पोलिस आयुक्त कृष्णात पिंगळे यांनी भेट दिली.  

प्लास्टिक पिशव्या हद्दपार
मंदिर परिसरात यंदा प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे आणि परिसरातील बहुतांश सर्वच व्यावसायिकांनी प्लास्टिक पिशव्यांपेक्षा कापडी पिशव्यांवर भर दिला आहे. हॉटेल व्यावसायिकांनीही यंदा पार्सलसाठी कापडी पिशव्यांचा वापर सुरू केला आहे. 

पालखी सोहळा
रात्री साडेनऊला अंबाबाई मंदिरात पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. पावसामुळे भाविकांनी रेनकोट आणि छत्री घेऊनच उपस्थिती लावली. 

सोंगी भजन रंगले
शिवाजी चौक तरुण मंडळातर्फे सोंगी भजन स्पर्धा सुरू आहे. पावसामुळे भजन होते की नाही, शंका होती; पण मोजक्‍या रसिकांच्या उपस्थितीत भजनही रंगले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news laddoo sell in Ambabai temple