कोल्हापूरच्या अंबाबाईची अष्टादशभुजा महालक्ष्मी रूपात सालंकृत पूजा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

कोल्हापूर ः शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची शनिवारी "अष्टभूजा महालक्ष्मी'''' रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. श्रीपूजक माधव व मकरंद मुनीश्वर आणि सहायक रवी माईनकर यांनी ही पूजा बांधली.

कोल्हापूर ः शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची शनिवारी "अष्टभूजा महालक्ष्मी'''' रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. श्रीपूजक माधव व मकरंद मुनीश्वर आणि सहायक रवी माईनकर यांनी ही पूजा बांधली.

अष्टादशभुजा महालक्ष्मी रूपात सालंकृत पूजा 
दुर्गासप्तशतीमधील मध्यम चरित्राची नायिका म्हणजे अष्टादशभुजा महालक्ष्मी. इथे महिषासुरमर्दिनीलाच महालक्ष्मी म्हटले आहे. अष्टादश म्हणजेच अठरा हातांनीयुक्त अशी ही देवीच या ग्रंथाची प्रधान नायिका आहे. सर्व देवतांच्या अंशांनी युक्त असे तिचे वर्णन आढळते. ही देवता म्हणजे सिंहवाहिनी दुर्गाच. दुर्गासप्तशती ग्रंथानुसार महिषासुराचा वध करण्यासाठी विविध देवतांनी आत्मतेजापासून हिची निर्मिती केली. महिषासुराचा वध हा फक्त स्त्रीच्याच हातून होणार, असा त्याला वर असल्याने देवतांनी आत्मशक्तीचे आवाहन केले. त्याप्रमाणे आत्मशक्तीने अष्टादशभुजा देवीचे स्वरूप धारण केले. नंतर देवीने महिषाचा वध करून तिन्ही लोक स्वस्थ केले. याही देवतेचे विस्तृत चरित्र देवीभागवत ग्रंथामध्ये मिळते. दुर्गा सप्तशती ग्रंथानुसार देवीच्या अठरा हातांमध्ये - अक्षमाला, परशू, गदा, बाण, वज्र, कमळ, धनुष्य, कमंडलू, कालदंड, शक्ती, खड्‌ग, ढाल, शंख, घंटा, पानपात्र, शूल, पाश आणि चक्र अशी आयुधे आहेत. देवीचा रंग पोवळ्यामाणे तांबडा कल्पिला आहे. तिचे मुख धवल तर तिचे हात निळे कल्पिले आहेत. यामागचे कारण असे, की ही देवता ब्रह्मा-विष्णू-महेश तत्त्वांनी युक्त असल्याचे सूचित करायचे आहे. त्यामुळेच अंबाबाईला त्रिगुणात्मिका आणि आदिजननी म्हटले जात असावे. वणी (सप्तशृंगी) या क्षेत्री असलेली जी देवी आहे, ती ही अष्टादशभुजा महालक्ष्मीच आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news navratra ambabai puja