क्रिकेटपटू स्मृती मानधना होम क्वारंटाईनमधून बाहेर...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 March 2020

ऑस्ट्रेलियाहून परतलेल्या स्मृती मानधना हिला घरात थांबून चौदा दिवस आराम करण्याची सूचना महापालिकेने दिली होती.

सांगली - भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना विश्वचषक महिला ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेतून परतल्यानंतर होम क्वारंटाईन झाली होती. ऑस्ट्रेलियातून भारतात परत येताच ती घरात थांबून होती. तिचा तो 14 दिवसांचा कालावधी संपला असून सध्या ती सांगलीतील घरी सुरक्षितपणे थांबून आहे. 

गाणे ऐकणे, वाचन हे आवडीचे छंद तिने याकाळात जोपासले आहेत. महिला ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी स्मृती मानधना ऑस्ट्रेलियाला गेली होती. या स्पर्धेत भारतीय संघ उपविजेता ठरला. स्पर्धा संपेपर्यंत जगात कोरोना विषाणू बद्दल फारशी भितीची स्थिती नव्हती. भारतीय संघ देशात परतल्यानंतर मात्र जगभर स्थिती बिघडत गेली. ऑस्ट्रेलियामध्ये ही कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळू लागली होती.

वाचा - कोरोना'शी 'सामना' महत्त्वाचा की राजकारण ? 

त्यामुळे सहाजिकच ऑस्ट्रेलियाहून परतलेल्या स्मृती मानधना हिला घरात थांबून चौदा दिवस आराम करण्याची सूचना महापालिकेने दिली होती. त्याचे तंतोतंत पालन करत स्मृतीने चौदा दिवस घरीच थांबण्याचा निर्णय घेतला होता. ते 14 दिवस संपल्यानंतर ही तिने घरातून बाहेर न पडता सुरक्षितपणे राहण्यातच प्राधान्य दिले आहे. तिचा नियमित सराव सांगली आणि इचलकरंजी येथे चालत होता. तोही तिने आता पूर्णपणे थांबवला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricketer smriti mandhana out of home quarantine