बिदरमधील ते 11 जण निघाले कोरोना पॉझिटीव्ह...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 April 2020

बिदरमधील 27 मुस्लिमांनी तबलीक संमेलनामध्ये भाग घेतला होता. या सर्वांची बदर इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्समध्ये तपासणी करण्यात आली होती. 

बिदर (कर्नाटक) - नवी दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलिक संमेलनासाठी गेलेल्या बिदरमधील 11 जणांचे कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह निघाले आहेत. त्यामुळे सध्या बिदरमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. बिदरमधील 27 मुस्लिमांनी तबलीक संमेलनामध्ये भाग घेतला होता. या सर्वांची बदर इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्समध्ये तपासणी करण्यात आली होती. यापैकी 11 जणांच्या स्वॅब तपासणीचे अहवाल प्राप्त झाले असून ते कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात 9 जण हे बिदर शहरातील रहिवासी असून 1 बसवकल्याणमधील तर दुसरा बिदरजवळील खेडेगावचा रहिवासी असल्याचे समजते. बिदर जिल्हा प्रशासनाने आणखी शोध सुरू केला असून तबलीक संमेलनात सहभाग घेतलेल्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान अकरा रुग्ण सापडले असल्याने सध्या बिदरमध्ये भितीचे वातावरण परसरले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eleven peoples in Bidar are corona positive