दाजीपुरातील पर्यटक निम्म्यावर

Half of the tourists in Dajipur
Half of the tourists in Dajipur

राशिवडे बुद्रुक : दाजीपूर अभयारण्य पर्यटन क्षेत्राला यंदा पावसापाठोपाठ कोरोनामुळे मोठा फटका बसला आहे. प्रतिवर्षी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत यंदा निम्म्याहून अधिक घट झाल्याची दिसून आले. त्यामुळे सहाजिकच महसुलही निम्म्याने खाली आला आहे. यावर विसंबून असलेल्या येथील सेवा सुविधा देणाऱ्यांना याची मोठी झळ बसली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून अलिकडे राधानगरी तालुक्‍यातील दाजीपूर अभयारण्याला लोकांकडून विशेष पसंती मिळत असल्याचे वाढत्या संख्येवरून दिसून येते. केवळ गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे अभयारण्य निमसदाहरित वनांमध्ये मोडते. विलक्षण अनुभूती आणि निसर्गसंपन्न परिसर, नीरव शांतता यामुळे दगदगीच्या जीवनातून काहीशी उसंत मिळण्यासाठी लोक दाजीपूरकडे वळताना दिसत आहेत. केवळ गव्यांना पाहायचे म्हणून जायचे हा दृष्टीकोन कमी झाला असून येथील निसर्ग न्याहाळून मनाला ताजेतवाने करून घेण्यामध्ये लोकांना धन्यता वाटत आहे. मात्र यंदा यावर नैसर्गिक आपत्ती आल्याने पर्यटन व्यवसाय धोक्‍यात आला. 

सुरुवातीला दीर्घकाळ लांबलेला पाऊस हे अभयारण्य वेळेत खुले न करण्याला कारणीभूत ठरले. एक नोव्हेंबरला अंतर्गत रस्त्यांची डागडुजी केल्यानंतर अभयारण्य यांसाठी खुले केले जाते मात्र यंदा तब्बल एक महिना म्हणजे एक डिसेंबरला ते सुरू झाले. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीतील पर्यटकांचा ओढा तिथेच थांबला. हळूहळू पर्यटकांची गर्दी होत असताना मध्यंतरी आठ दिवस अचानक दिलेल्या प्राणी गणनेमुळे अभयारण्य बंद ठेवले होते. तो काळ ही पर्यटकांसाठी मुकला. पुढे उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे अभयारण्य आणि तो परिसर तुडवण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी असते. परंतु यावर कोरोनाचे संकट आले. मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच कोरोणाने विळखा घातल्याने नाइलाजाने जंगलक्षेत्रही पर्यटकांसाठी बंद करावे लागले. 

ऐन उन्हाळ्यात पहिल्यांदाच कोरोना मुळे दाजीपुर अभयारण्याची फाटक बंद ठेवावे लागले. 31 मे ला किंवा साधारणता पावसाची सुरुवात होईपर्यंत पर्यटकांसाठी दरवाजे खुले असतात. या काळात सरासरी एका पर्यटन हंगामात आठ ते दहा हजार पर्यटक या अभयारण्याला भेट देत असतात. त्यातून चार ते पाच लाख रुपये महसूल जमा होत असतो. यंदा जेमतेम चार ते साडेचार हजार पर्यटकांनी भेट दिली. कसाबसा सव्वा लाख रुपयांचा महसूल येथे जमा झाल्याचे पुढे येत आहे. यंदाच्या या संकटांचा फटका स्थानिक लोकांना व बाजारपेठेला बसला आहे. राधानगरी येथे पर्यटनाशी आधारित अनेक सुविधा अलिकडे वाढल्या आहेत. रिसॉर्ट, हॉटेल्स आणि जंगल भ्रमंती साठी स्पेशल गाड्या उपलब्ध केल्या जात आहेत. या सेवा देणाऱ्या लोकांवरही यंदा कोरोनाची कुऱ्हाड कोसळली आहे. 

साडेचार हजारच पर्यटकांची भेट... 
डिसेंबर नंतर सुरू झालेल्या यंदाच्या हंगामात 4083 प्रौढ व 434 लहान मुलांनी भेटी दिल्या आहेत. हा आकडा नेहमीच्या पर्यटकांच्या निम्म्याहून कमी आहे. याचा मोठा फटका या परिसरातील पर्यटनावर आधारित असलेल्या व्यवसायासह येथील यंत्रणेला बसला आहे. 

दृष्टिक्षेपात दाजीपूर पर्यटन... 
- कोरोनामुळे ऐन पर्यटन हंगामात अभयारण्याचे गेट बंद 
- साधारणतः 31 मेपर्यंत दाजीपूर अभयारण्य खुले असते 
- पर्यटनावर अवलंबून असलेल्या स्थानिकांना मोठा फटका 
- एका हंगामात आठ-दहा हजार पर्यटक भेट देतात, यंदा साडेचार हजार पर्यटकच आले 
- कसाबसा सव्वा लाखाचा महसूल मिळाला 
- प्राणी गणनेमुळे आठ दिवस पर्यटन बंदचीही भर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com