Republic Day 2020 : येथून निघाले दोघे सायकलस्वार त्यांनी गाठले दिल्लीचे द्वार.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aniket And Aakash Bicycle Activities Republic Day In Delhi Kolhapur Marathi News

अनिकेत आणि आकाशने ‘दोन गडी कोल्हापुरी’ हा हॅशटॅग घेऊन कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठा येथून सुरू केलेला हा प्रवास आखिर....

Republic Day 2020 : येथून निघाले दोघे सायकलस्वार त्यांनी गाठले दिल्लीचे द्वार..

कोल्हापूर :‘दोन गडी कोल्हापुरी’ हा हॅशटॅग घेऊन कोल्हापूरातील आकाश बोकमुरकर आणि अनिकेत कांबळे या दोन तरूणांनी सायकलव्दारे 2 हजार किलो मीटर प्रवास करून आनंदी जीवनाचा संदेश देत दिल्ली गाठली आहे. सायकलीवरून भटकंती करण्याचा छंद असलेल्या या दोघांनी 26 जानेवारी पूर्वीच दोन दिवस अगोदर ठरलेला टप्पा पार करीत दिल्लीत पोहोचले आहेत

    अनिकेत हा शिवाजी विद्यापीठात इंग्रजी अधिविभाग आणि स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करत होता. अभ्यास करीत असताना त्याला एक वेगळा काहीतरी छंद जोपासावा असे वाटले. त्यामुळे त्यांनी सायकलीवरून भटकंतीचा मार्ग निवडला. अनेक गड-किल्लेची भटकंती तो आपल्या मित्रांसह सायकलीवरून करीत असे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधीत 26 जानेवारी रोजी दिल्लीत जाण्याचा संकल्प अनिकेत यांनी केला होता. या उपक्रमांमध्ये आकाशने सहभागी होण्याचा निर्णय घेतला . तसेच आकाश बोकमुरकर याने शिवाजी विद्यापीठातील मास कम्युनिकेशन अँड जर्नालिसीम हे पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून सध्या तो जाहिरात विभागात काम करतो.

हेही वाचा - वस्त्र नगरीत वाचन संस्कृती जपण्यासाठी केला जातो असा प्रयत्न....

जाती-धर्माच्या पलीकडची  माणुसकी
दोघेही सायकलीवरून दिल्लीकडे जाण्यास 2 जानेवारी रोजी निघाले. हा प्रवास मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरीयाणा या राज्यांमधून झाला आनंदी जीवनाचा संदेश देत हा प्रवास केला असून प्रवासातही आनंद मिळाल्याचा अनुभव आकाश आणि अनिकेत यांना आला. 12 किलो वजन घेऊन हा प्रवास केला असून, या दरम्यान कमीतकमी साहित्य वापरून कस जगता येते याचाही अनुभव आला.

हेही वाचा- गावकऱ्यांनो ग्रामपंचायतीत शंभर रुपये भरा आणि मोफत हे मिळवा...

सोबतच रात्रीचे वास्तव्यासाठी मंदिर, मस्जिद, गुरूव्दारा अशा धार्मिक ठिकाणीच थांबने असल्यामुळे त्या-त्या भागातील संस्कृती, भाषा समजली आणि खादयपदार्थांचा आस्वाद त्यांनी घेतला. सायकलीवरून हा उपक्रम करत असताना जाती-धर्माच्या पलीकडे ही माणुसकी कशी असते याचा अनुभव या दोघांना आला. प्रत्येक ठिकाणी त्यांना झालेली मदत यामुळे ते अधिकच भारावून गेले. सायकल प्रवासाचा पुढील टप्पा हा कोकणाचा असणार आहे. लवकरच हा प्रवास सुरू करणार असल्याचे आकाश आणि अनिकेत  यांनी सांगितले.

हेही वाचा- सायबर गुन्हे विश्‍लेषण कोल्हापुरात...

फेसबूकवरील मित्रांची मदत

फेसबूकच्या माध्यमातून जोडलेले पण कधीही भेट न झालेले आभासी मित्रांचे ‘रियल’ वास्तव्य या प्रवासामुळे कळले. आभासी जगातील मित्र हे आभासी नसुन खरेच असतात हा विश्वास दृढ झाला. फेसबूकवरील मित्रांनी या संपुर्ण प्रवासाचा खर्च उचलला सर्वांचे मनापासून आभार. 

 आकाश बोकमुरकर

जग हे सुंदर आहे अनुभवायला मिळाले....

खरेतर सायलीने एवढा टप्पा गाठताना अनेक शंका कुशंका  वाटत होत्या मात्र प्रत्येक ठिकाणी मिळालेल्या सहकार्याने आम्ही भरून गेलो . घराबाहेर पडल्यामुळे जग हे समुद्र आहे हे अनुभवायला मिळाले . 
अनिकेत कांबळे 
 

Web Title: Aniket And Aakash Bicycle Activities

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..