दिलासादायक -साडेपाच हजार ऊसतोड कामगार व जनावरांची जवाबदारी घेतली या कारखान्याने....

The factory took responsibilitylaborers and livestock kolhapur marathi news
The factory took responsibilitylaborers and livestock kolhapur marathi news

इचलकरंजी  (कोल्हापूर) : साखर कारखान्यांचा हंगाम संपला असताना केवळ लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील हजारो ऊसतोड कामगार अडकून पडले आहेत. त्या सर्वांना घराची ओढ लागली असून त्यांच्या समस्या संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क साधून योग्य तो मार्ग काढावा अशी विनंती केली. त्यावर मंत्री मुंडे यांनी लवकरात लवकर या प्रश्‍नी मार्ग काढण्याची ग्वाही दिली.

  हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर याठिकाणी राज्याच्या विविध भागातून आलेले पाच हजार ऊसतोड कामगार आहेत.  आज आमदार प्रकाश आवाडे यांनी कारखाना कार्यस्थळी जावून या ऊसतोड कामगारांची भेट घेतली. त्यांची विचारपूस करताना ऊसतोड कामगारांनी आपल्या व्यथा मांडतानाच घरी जाण्यासाठी मार्ग काढावा आणि आमची रवानगी करावी अशी विनंती केली. यावेळी कारखान्याचे केन कमिटी चेअरमन राहुल आवाडे, कार्यकारी संचालक मनोहर जोशी, शेती अधिकारी किरण कांबळे आदी उपस्थित होते.

साडेपाच हजार कामगार एकाच ठिकाणी 

यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी दूरध्वनीवरुन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क साधून तेथील परिस्थितीची संपूर्ण माहिती दिली. सध्या स्थितीला जवाहर कारखाना कार्यस्थळी साडेपाच हजार कामगार आहेत. त्या सर्वांना आपल्या घराकडे जाण्याची ओढ लागली असून ते वारंवार विनंती करत असल्याचे सांगत  आहेत. या प्रश्‍नी राज्य शासनाने काही तरी मार्ग काढावा अशी विनंती केली. त्यावर मंत्री मुंडे यांनी राज्याच्या कॅबिनेट बैठकीत यावर निश्‍चितपणे मार्ग काढू अशी ग्वाही दिली.

हेही वाचा- लॉकडाऊनने यंत्रमाग व्यवसाय कोलमडणार
कारखान्याचे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या मार्गदर्शखानाली सर्व कामगारांना कारखान्याच्यावतीने आवश्यक जीवनावश्यक साहित्य पुरविले जात आहे. या प्रश्‍नी राज्य शासन मार्ग काढेल, असा विश्‍वासही आमदार आवाडे यांनी व्यक्त केला. जोपर्यंत हे सर्व ऊसतोड कामगार कारखान्यावर असतील तोपर्यंत त्यांची व त्यांच्या जनावरांची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल, असेही आमदार आवाडे म्हणाले.

कामगारांसाठी 75 लाख रुपये
शासनाच्या आदेशानुसार सर्व कामगारांच्या दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था कारखान्याच्यावतीने करण्यात आली आहे. तर जवळपास 2700 जनावरे असून त्यांच्याही चार्‍याची व्यवस्था कारखान्याने करुन दिली आहे. आजअखेर यासाठी कारखान्याने 75 लाख रुपये खर्च केले असून कोणत्याही ऊसतोड कामगाराला कमतरता भासू दिलेली नाही, असे आमदार आवाडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com