'ती' महिला जोरजोरात ओरडत होती ; लोक म्हणायला लागले तिला कोरोना झालाय पण सत्य काय तर....

 the rumor of a corona woman in belgum
 the rumor of a corona woman in belgum
Updated on

बेळगाव - बेळगाव शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रामदेव गल्लीत कोरोनाबाधीत महिला आल्याच्या अफवेने बुधवारी (ता.3) काही काळ गोंधळ उडाला.

रामदेव गल्लीत राम मंदीराजवळ एक महिला जोरजोरात ओरडत होती. त्या ओरडण्यामुळे संबंधित महिलेला कोरोना झाल्याची अफवा पसरली. याची माहिती खडे बाजार पोलिस ठाण्याला देण्यात आली. त्यावर तातडीने पोलिस त्या ठिकाणी दाखल झाले. पण त्या महिलेने मद्यपान केल्याचे व नशेत ती ओरडत असल्याचे निदर्शनास आले. दोन महिला कॉन्स्टेबलनी तातडीने त्या मद्यपी महिलेला ताब्यात घेतले व रामदेव गल्लीतून बापट गल्लीतील वाहनतळाकडे नेवून सोडले. पण पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही त्या महिलेचे ओरडणे सुरूच होते. पोलिसांच्या तावडीतून सुटून जाण्याचा प्रयत्न त्या महिलेकडून सुरू होता. 

सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. मंगळवारी बेळगाव शहरात तीन ठिकाणी कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यामुळे लॉक डाऊन शिथिल झाले तरी बेळगावकरांमध्ये कोरोनाची धास्ती कायम आहे. कोरोनाबाधीत व्यक्तीला श्‍वासोच्छ्वासाची समस्या उद्भवते. संबंधित व्यक्तीला नीट श्‍वास घेता येत नाही हे नागरीकाना माहिती आहे. रामदेव गल्लीत ती महिला जोरजोरात ओरडत होती, त्यामुळे तीला श्‍वास घेण्यात अडचण येत असावी असा कयास तेथे उपस्थित असलेल्यांनी बांधला. त्यामुळे महिला कोरोनाबाधीत असावी असा अंदाजही बांधला. लागलीच त्याची माहिती संपूर्ण खडे बाजार परीसरात पसरली. रामदेव गल्लीत बघ्यांची गर्दी झाली, त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. पोलिसही तातडीने त्या ठिकाणी पोहोचले. पण संबंधित महिलेला कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शिवाय त्या महिलेने मद्यपान केल्याचेही पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे आधी त्यानी महिलेला तेथून बाजूला जाण्यास सांगीतले. पण त्या महिलेने कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मग तिला ताब्यात घेवून बापट गल्ली वाहनतळाकडे नेण्यात आले.

ती महिला कोरोनाबाधीत असल्याच्या संशयाने रामदेव गल्लीतील रहिवाशी व व्यापारी प्रारंभी धास्तावले होते. पण ती मद्यपी महिला असल्याचे कळताच त्यानीही सुटकेचा निश्‍वास सोडला. पोलिसांनीही मग नागरीकांना हटकले व गर्दी पांगविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com