प्रभाग रचनेतील बदल नगरसेवकांची उडविणार झोप: पाच ऐवजी दहा प्रभागांत बदल

10 Changes in word structure kolhapur
10 Changes in word structure kolhapur
Updated on

कोल्हपूर : आगामी महापालिका निवडणुकीसाठी दहा प्रभागांच्या भौगोलिक तसेच लोकसंख्येच्या रचनेत किरकोळ का असेना पण झालेला बदल या प्रभागातील विद्यमान नगरसेवकांची झोप उडविणारी ठरू शकते. किमान तीनशे ते चारशे लोकसंख्या लगतच्या प्रभागात गेल्याने या नगरसेवकांना नव्याने विजयाची समीकरणे रचावी लागणार आहेत. 

कदमवाडी-भोसलेवाडी (प्रभाग क्रमांक आठ), कदमवाडी (नऊ), कनाननगर (15), साईक्‍स एक्‍सटेंशन (24), राजारामपुरी एक्‍सटेंशन (39) चंद्रेश्‍वर (54), पद्माराजे उद्यान (55)शिवाजी विद्यापीठ कृषि महाविद्यालय (64),तपोवन (69), राजलक्ष्मीनगर (70) या प्रभागांचा यात समावेश आहे. लोकसंख्येच्या आधारे प्रभागांची रचना झाली आहे. एक प्रभाग सात हजार आठशे इतक्‍या लोकसंख्येचा आणि दूसरा पाच हजार तीनशे लोकसंख्येचा इतकी मोठी तफावत रचनेत होती. राज्य निवडणूक आयोगाने यात बदल करण्याची सूचना महापालिका प्रशासनाला केली. त्यानुसार प्रभागांच्या प्रारूप रचनेत बदल झाला आहे. नुकत्याच झालेल्या आरक्षण सोडतीत दहा प्रभागांच्या आरक्षणात बदल झाला आहे. प्रभागरचना विद्यमान नगरसेवकांना सोयीची तसेच काहींना गैरसोयीची ठरणार आहे. निवडणुक डोळ्यासमोर संबंधित भागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत.

ऐनवेळी हक्काचा भाग तुटल्याने विद्यमानांची अडचण होणार आहे. किमान तीनशे ते चारशे लोकसंख्या अन्य प्रभागात गेल्याने विजयाची संधी हुकण्याची शक्‍यता आहे. ज्या भागाचा प्रभागात समावेश नव्हता त्याचा भागाचा समावेश झाल्याने काहींची गैरसोय झाली आहे. प्रभाग प्रारूप रचनेवर हरकती नोंदविता येणार आहेत. त्या निकालात निघाल्या तर ठीक अन्यथा नव्याने झालेली प्रभागरचना नाईजलाने स्वीकारावी लागणार आहे. सुरवातीला पाच प्रभागाच्या रचनेत किरकोळ बदल होईल असे वाटले होते. नंतर ही संख्या दहा पर्यंत गेली. 

2010 ला प्रभागांची नव्याने रचना झाली आहे. प्रभागातील लॅन्ड मार्क डोळ्यासमोर ठेऊन रचना झाली. अनुसुचित जातीचे प्रभाग निश्‍चित करताना लोकसंख्येचा विचार झाला. उतरत्या क्रमाने प्रभाग लावले गेले. पहिल्यांदाच अनुसुचित जातीचे अकरा प्रभाग नव्याने तयार झाले आहेत. ही रचना करताना काही प्रभागांच्या लोकसंख्येत तफावत असल्याचे आढळून आले. कमाल 7500 पर्यंतची लोकसंख्या आयोगाला मान्य होती. मात्र 7800 च्या वरती आकडा सरकल्याने आयोगाने तातडीने लोकसंख्येत समानता आणण्याचे आदेश दिले. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rare bird discovered in Maharashtra forest
Nandwal temple nirmalya recycling project
Rising Tourist Footfall at Rautwadi Waterfall
Design of Kolhapur Cricket Stadium
Marathi News Esakal
www.esakal.com