
कोल्हापूर : बाजार आटोपून खासगी गाडीने गावी निघालेल्या लोकांची गाडी झाडाला धडकली. त्यात आठ जण जखमी झाले. निर्जन ठिकाणी झालेल्या अपघाताने सगळेच हबकले. कोणीतरी 108 ला फोन केला. अवघ्या पंधरा मिनिटांत दोन रुग्णवाहिका आल्या. जखमींना रुग्णवाहिकेतच व्हेंटिलेटर लावला, प्रथमोपचार सुरू केले. रुग्णवाहिका शासकीय रुग्णालयात पोहचली, उपचार सुरू झाले, जीवदान मिळाले. अशाच प्रकारे सर्पदंश, विषबाधा, आग आदी दुर्घटनांतील जखमींपासून गंभीर आजारी रुग्णांपर्यंत 2 लाख 23 हजार व्यक्तींना 108 रुग्णवाहिकेने दवाखान्यात पोचवले. जीवदान देणाऱ्या या सेवेने सातव्या वर्षात पदार्पण केले आहे. कोरोना काळात सर्वाधिक 19 हजार 518 बाधितांना रुग्णालयात पोहचवून लक्षवेधी योगदान दिले.
ज्यांच्यासोबत कोणीही नाही त्यांच्या जगण्याची दोरी बळकट करण्यासाठी 108 रुग्णवाहिका हमखास येते, असा विश्वास लोकांना असल्याचे मत सेवेचे जिल्हा समन्वयक डॉ. संग्राम मोरे यांनी व्यक्त केले.
दोन प्रकारच्या रुग्णवाहिका
ऍडव्हान्स लाईफ सपोर्ट सुविधेच्या 12 रुग्णवाहिका आहेत. यात ऑक्सिजन, व्हेन्टिलेटरसह अन्य उपचारपूरक सुविधा आहेत. हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीला शॉक देण्यासाठी डीफेब्रिटरची तांत्रिक आधुनिक सुविधा आहे. त्यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांसाठी ही रुग्णवाहिका उपयुक्त ठरते, तर बेसिक लाईफ सपोर्ट सुविधेच्या 26 रुग्णवाहिका आहेत. यात प्रथमोपचार, ऑक्सिजन फोल्डेड स्ट्रेचर व बेड अशा सुविधा आहेत.
108 रुग्णवाहिकेची सेवा मोफत आहे. जखमी, गंभीर रुग्णाला योग्यवेळी योग्य ठिकाणी उपचारासाठी पोहचविले जाते. गरजेनुसार प्रथमोपचारही केले जातात. गाडीत डॉक्टरही असतात, त्यामुळे जखमी किंवा रुग्णाला वेळीच उपचार मिळतो. यातून मृत्यूचा धोका कमी होण्यास मदत होते. या सेवेची उपयुक्तता मोठी आहे.''
डॉ. एस. एस. माळी, जिल्हा शल्यचिकित्सक
सर्वाधिक सेवेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या
अपघात जखमी :19 हजार 410
प्रसूती : 59 हजार 975
वैद्यकीय गरज : 1 लाख 20 हजार 517
विषबाधा : 7 हजार 866
हृदयविकार : 455
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.