ते साठजण लढले आणि जिंकले सुध्दा !... पोलीस योद्धे पुन्हा सेवेत रुजु

109 police are corona positive in kolhapur out of that 60 police start his duty to fight after corona
109 police are corona positive in kolhapur out of that 60 police start his duty to fight after corona
Updated on

कोल्हापूर : कोरोनावर मात करून पुन्हा कोरोनाविरोधातील लढाईत जिल्ह्यातील साठ पोलिस पुन्हा सहभागी झाले. मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत प्रबोधन करत गणेशोत्सवासह दैनंदिन कर्तव्य पेलण्यासाठी योद्धे कार्यरत झाले आहेत.

कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी मार्च महिन्यात लॉकडाउन लागू झाला, तशी पोलिसांची कोरोनाविरोधातील लढाई सुरू झाली. ही लढाई पाच महिन्यांपासून अव्याहतपणे सुरू आहे. सोशल डिस्टन्सिंग पालनाची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्याबरोबर जिल्हा नाकाबंदी, रुग्णालयाबाहेरील बंदोबस्ताची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर आहे. लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यानंतर गुन्ह्यांचाही आलेख वाढू लागला. त्यावर अंकुश ठेवण्याचे काम पोलिस करीत आहेत. 

अनेकांशी दररोजच्या संपर्कामुळे कोरोनाचा जिल्हा पोलिस दलात तीन महिन्यांपूर्वीच शिरकाव झाला. आतापर्यंत पोलिस अधिकारी व कर्मचारी असे एकूण १०९ जण बाधित झाले. काही पोलिसांच्या कुटुंबीयांनाही याचा फटका बसला. आपल्यापेक्षा कुटुंबाची काळजी करत आतापर्यंत सुमारे ६० पोलिसांनी कोरोनावर मात केली. त्यानंतर नव्या उमेदीने व आत्मविश्‍वासाने कामावर रुजूही झाले. कोरोना विरोधातील लढ्यात ते पुन्हा सहभागी झाले. बस्स, या संकटाचा प्रतिबंध करायचाच, असा जणू निर्धारच त्यांनी मनाशी केला आहे.

कोरोना सारख्या संसर्गावर मात करण्यासाठी शरीर तंदुरुस्त ठेवावे लागते. त्यासाठी वडा, भजी यांसारखे तेलकट पदार्थाऐवजी पौष्टिक आहार, किमान दिवसाकाठी एक फळ आणि सहा ते सात तासाची झोप हा त्यावरील जालीम उपाय ठरतो. ताप, खोकला यांसारखी साधी लक्षणे जरी आढळल्यास घरातील सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरते. 

कोरोनाचा प्रतिबंधासाठी मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर हेच प्रभावी औषध आहे. आम्ही त्याचे पालन करतो तुम्हीही त्याचे पालन करून कोरोना संकटापासून आपला बचाव करा असा कानमंत्रही हे कोरोना योद्धे इतरांना देत आहेत. 

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com