शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी ११ जणांचे अर्ज 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

माजी कुलगुरू देवानंद शिंदे यांचा कार्यकाल संपल्याने कुलगुरू पद रिक्त झाले.

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथून ११ जणांनी अर्ज केले आहेत. विद्यापीठ अधिविभागातील ७ प्राध्यापकांचाही यामध्ये समावेश आहे. काही स्वायत्त विद्यापीठाच्या प्रमुखांनीही यासाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी (ता. २) अर्ज करण्याचा अखेरचा दिवस आहे. 

माजी कुलगुरू देवानंद शिंदे यांचा कार्यकाल संपल्याने कुलगुरू पद रिक्त झाले. सध्या प्रभारी कुलगुरू म्हणून डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे पदभार आहे. कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी शोध समितीही नेमली आहे. गुरुवारी यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. गेल्या पंधरा दिवसांत या पदासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा येथून ११ जणांनी अर्ज केले असून, यामध्ये प्राचार्य, विद्यापीठ अधिविभागप्रमुख, प्राध्यापक यांचा समावेश आहे. 

विद्यापीठातील अधिविभागातील सात जणांनी अर्ज केल्याचे समजते. यामध्ये भौतिकशास्त्र आणि अर्थशास्त्र विभागातील प्रत्येकी दोन प्राध्यापकांचा समावेश आहे. याशिवाय जैवतंत्रज्ञान विभाग, रसायनशास्त्र विभाग, संख्याशास्त्र विभागातूनही प्राध्यापकांनी अर्ज केले आहेत. काही स्वायत्त महाविद्यालये आणि विद्यापीठांमधूनही कुलगुरू पदासाठी काही जण इच्छुक असून, त्यांनीही अर्ज केले आहेत.

हे पण वाचा - मोठी बातमी ; अंत्यसंस्काराहून परतत असताना त्याला कोरोना असल्याचे समजले अन्...

 

हे पण वाचा -  काय सांगताय ! चक्क आपल्या 'लाल परीत' वाहिले जात आहेत 'हे' दगड...  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 applications for the post of Vice Chancellor of Shivaji University