कोल्हापूर जिल्ह्यात निघतोय गांजाचा धूर... 

राजेश मोरे 
Sunday, 27 September 2020

पोलिसांच्या या कारवाईवरून जिल्ह्यात गांजाचा धूर मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतोय हे उघड होते.

कोल्हापूर - जिल्ह्यात गांजाचा धूर निघतोय. हे पोलिसांनी यावर्षात तब्बल 111 किलो गांजा जप्त केला, यावरून स्पष्ट होत आहे. गांजा तस्कर एजंटामार्फत जिल्ह्यात आपले बस्तान बसविण्याचा प्रयत्न करीत आहेत. फक्त एजंटावर कारवाई नको तर मुळावर घाव घाला अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

लॉकडाऊन काळात राजारामपुरी पोलिसांनी शेंडा पार्क येथे छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 20 किलो गांजा जप्त केला. यानंतर याचे कनेक्‍शन शोधून काढण्यास सुरवात केली. त्यातही दीड किलो गांजा जप्त करत सहा जणांवर कारवाई केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मुरगूड परिसरात तिघांना ताब्यात घेऊन दीड किलो गांजासह, भांगेच्या गोळ्या आणि दोन लाख 46 हजाराची रोकड जप्त केली होती. जिल्ह्यातील यावर्षीच्या या मोठ्या कारवाया ठरल्या. दरम्यान, तोरस्कर चौक परिसरात एकाकडून दीड किलो, मोरेवाडीत दोघांकडून अर्धा किलो, कदमवाडीत दोघांकडून 250 ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला. जिल्ह्यात यावर्षात पोलिसांनी अमंली पदार्थ अंतर्गत केलेल्या कारवाईतून 111 किलो गांजा जप्त केला. त्याचबरोबर नुकतेच वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने पाठलाग करून दोन किलोहून अधिकचा मोटारीत लपवलेला गांजा जुना राजवाडा पोलिसांनी यश मिळाले. 

पोलिसांच्या या कारवाईवरून जिल्ह्यात गांजाचा धूर मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतोय हे उघड होते. सिगारेटमध्ये गांजा घालून त्याचा झुरका ओढण्याची आज जणू फॅशन बनू लागली आहे. गांजा तस्कर एजंटामार्फत अमंली पदार्थाचे जाळे जिल्ह्यात पसरविण्याचा प्रयत्न करू लागलेत. आता गांजा ओढणाऱ्या अगर त्याची विक्री करणाऱ्यावर फक्त कारवाई नको तर थेट मुळापर्यंत जावून कारवाई करा अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

हे पण वाचा ''छत्रपती घराणे आमची अस्मिता ; खासदार संभाजीराजेंना दुखावण्याचा हेतू नव्हता''

 

2018 मधील गुन्ह्यांचे स्वरूप 

प्रकार  दाखल उघड 
 दारू  1132 1132 
 अमली पदार्थ  50 50 

हे पण वाचा परीक्षा रद्द झाल्या; मग भरलेले शुल्कही परत करा! ; विद्यार्थ्यांची मागणी

 

2019 मधील गुन्ह्यांचे स्वरूप 

प्रकार दाखल उघड 
 दारू  1215  1214 
 अमली पदार्थ  32  32 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 111 kg ganja seized in one year at kolhapur district