ब्रेकिंग - कोल्हापूरात आणखी १२ जणांना कोरोनाची लागण

12 more corona patient found in kolhapur
12 more corona patient found in kolhapur

कोल्हापूर :   गेल्या तीन महिन्यापासून कोरोना रूग्ण संख्येत वाढ  होताना शनिवारी सकाळी आणखीन 12 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.  काल एका दिवसात 57 रूग्ण पॉझिटिव्ह आले होते .त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला असून एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1151  पोहचला आहे. 

दरम्यान आज आढळलेल्या  अहवालामध्ये एका पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यामुळे जिल्ह्यातील बाधित पोलिसांची संख्या दोन झाली आहे यापूर्वी पन्हाळा तालुक्यातील एका पोलिसाला कोरोनाची लागण झाली आहे.

 कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत आहे. अशात एका दिवसात  काल तीन कोरोनाग्रस्तांचे बळी गेले आहेत. आजवर एकूण 804 व्यक्ती कोरोना मुक्त झाल्या आहेत. 
काल रात्री उशिरा व आज  पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीमध्ये कोल्हापूर शहरात 2, करवीर 4 इचलकरंजी 2 गडिंग्लज 2 , पन्हाळा 1, गडहिंग्लज 1 इतक्‍या व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. 


क्वारंटाईन असलेल्या पैकी 208 व्यक्तींचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आलेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. उपचार घेणाऱ्यातील एकूण 12 कोरोनाग्रस्त गंभीर आहेत. जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयात झालेल्या आरोग्य तपासणीत 742 व्यक्तीचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत.  जिल्ह्यातील सहा शासकीय रूग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या 302 झाली आहे.

एकूण कोरोनाग्रस्त  -1151
एकूण कोरोनामुक्त- 804 
मृत्यू - 23 
सद्या उपचार घेणारे  - 312 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com