आजऱ्यातील 13 वाड्या, सात गावांचा टंचाई आराखड्यात समावेश 

13 Wadis And Seven Villages In Ajara Are Included In The Water Scarcity Plan Kolhapur Marathi News
13 Wadis And Seven Villages In Ajara Are Included In The Water Scarcity Plan Kolhapur Marathi News
Updated on

आजरा : आजरा तालुक्‍याचा संभाव्य पाणी टंचाई आराखडा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे. तालुक्‍यातील 7 गावे व 12 वाड्यांचा यामध्ये समावेश आहे. एप्रिल महिन्यापासून या गावात पाणी टंचाई भासण्याची शक्‍यता असल्याने टंचाई दूर करण्यासाठी विविध उपाय सुचविले आहेत. यासाठी 21 लाख 50 हजार रूपयांचा आरखडा जिल्हा प्रशासनाकडे सादर केला. 

तालुक्‍यात दरवर्षी दोन हजार मिमी पेक्षा अधिक पाऊस पडतो. यंदा देखील सरासरी 2600 मिमी. पाऊस झाला. दरवर्षी पावसाचे मीटर जरी चांगले असले तरी काही गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यंदा देखील तालुक्‍यातील 7 गावे व 13 वाड्यांना एप्रिलपासून टंचाई जाणवणार आहे. टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने विविध उपाय योजना सुचविल्या असून त्यानुसार टंचाई आराखडा तयार केला आहे.

तो जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. तालुक्‍यात बहिरेवाडी, मलिग्रे, मुमेवाडी, पेंढारवाडी, किणे, चितळे, सोहाळे या सात गावांचा समावेश आहे. पारपोली पैकी गावठाण, सुळेरान पैकी माऊली हायस्कूल वस्ती, वाटंगी पैकी शाहू वसाहत, खानापूर पैकी रायवाडा, उचंगी पैकी हुडे, गवसे पैकी वास्करवाडी, दाभिल पैकी दाभिलवाडी, चाफवडे आदर्श वसाहत, हरपवडे पैकी धनगरवाडा, शेळप पैकी भैरवनाथ मंदिर वस्ती, पेरणोली पैकी नावलकरवस्ती, वाटंगी पैकी मोरेवाडी व धनगरवाडा या वाड्यांचा टंचाई आराखड्यात समावेश केला आहे. 

सुचविलेले उपाय 
- नवीन विंधन विहीर 
- प्रस्तावित नळ योजंनाची विशेष दुरुस्ती 
- विंधन विहीरीची विशेष दुरुस्ती 
- जी. वाय. पाईप वाढविणे- तात्पुरत्या पुरक नळ योजना 
- टॅंकरने - बैलगाडीने पाणीपुरवठा 
- विहीरीचे अधिग्रहण, विहीर खोल करणे, गाळ काढणे 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com