
कोल्हापूर ः कोल्हापूर जिल्ह्यात आज नव्याने 133 रुग्णांची भर पडली आहे. तर आज जिल्ह्यात एका दिवसात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या कमी असल्याने शहरासह जिल्ह्यातील कोरोना केअरसेंटरमध्ये आता अनेक बेड रिकामे आहेत.
त्यामुळे पॉझिटीव्ह रुग्णांना आता बेड उपलब्ध होत आहे. गेल्या कांही दिवसापासून रुग्णसंख्या घटत असल्याने कोल्हापूरसाठी ही बाब दिलासादायक आहेत. आजअखेर जिल्ह्यात 45 हजार 728 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. यापैकी 36 हजार 508 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजवर 1497 जणांचा कोरानाने मृत्यू झाला आहे. सध्या 7723 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
आज एका दिवसात चंदगड तालुक्यात सर्वाधित दहा रुग्णांची नोंद झाली आहे. आजरा तालुक्यात 3, गडहिंग्लजमध्ये 8, गगनबावडा, हातकणंगले तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. कागल तालुक्यात 9, करवीर तालुक्यात 8, पन्हाळा तालुक्यात 6, राधानगरी 4, शाहूवाडी 3, शिरोळ 2 रुग्ण आढळून आले.
इचलकंरजी शहरात 23 तर कोल्हापूर शहरात आज एका दिवसात 38 रुग्ण आढळून आले. आज 295 स्वॅबचे अहवाल मिळाले. यामध्ये 231 जणांचा निगेटीव्ह अहवाल आला. तर 57 जणांचा अहवाला पॉझिटिव्ह प्राप्त झाला. आज 228 ऍन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये 215 निगेटीव्ह आले तर 13 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात हळूहळू परिस्थिती रुळावर येत आहे. आजपासून हॉटेल,बार,रेस्टॉरंट सुरु झाले आहेत. पण नियमांचे पालन करुन परवानगी देण्यात आली आहे. लोकांनी सोशल डिस्टनसह विविध नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत साथ आटोक्यात आहे.पण नियमाचे उल्लघंन झाले तर साथीचा धोका पुन्हा वाढू शकतो. त्यामुळे प्रशासन कोणत्याही परिस्थिीतीत जोखीम पत्करायला तयार नाही.त्यामुळे नियमाचे पालन काटेकोरपणे होण्याकडे प्रशासनाचा कल दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.