‘आयपीएल’ अबुधाबीत : ईर्षा कोल्हापुरात ; स्पर्धेचे रंगले सोशल वॉर

सुयोग घाटगे
Monday, 21 September 2020

स्पर्धेचे रंगले सोशल वॉर; स्टेटस, डीपी आणि मिम्सने रंगत
 

कोल्हापूर  : ‘आयपीएल’च्या १३ व्या हंगामाला सुरवात झाली आहे. प्रत्येक संघाच्या पाठीराख्यांमधील सोशल वॉरला आता सुरवात झाली. सामन्यापूर्वी आणि सामान्यानंतर सोशल मीडियावर माध्यमांवर या पाठीराख्यांमध्ये संघाप्रतीच्या प्रेमाला ऊत आला आहे. 

कोरोनाच्या सावटातच ‘आयपीएल’ला सुरवात झाली. अनेक नियमांच्या अधीन राहून खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत प्रेक्षकांना मात्र मैदानावर प्रवेश नाही आहे. मात्र, पहिलाच सामना रंगतदार झाल्याने या स्पर्धेची सुरवात धमाकेदार झाली. घरातील टीव्ही, हातातील मोबाईल ते काहींनी तर स्वतंत्र स्क्रीनची व्यवस्था करीत सामन्याचा आनंद लुटण्याची तयारी केली आहे.

सामन्याच्या सुरवातीला समाजमाध्यमांवर रंगणारा कलगीतुरा सामन्या दरम्यान कल बदलेल, तसा बदलत राहतो. यात अनेक समाजमाध्यमांचा आधार घेताना विविध समाजमाध्यमांचे डीपी, स्टेटस, टेक्‍स्ट आणि व्हिडिओ स्टेटसवरून संघाच्या पाठिंब्याचे, तर विरोधी संघांची टर्रर्र उडवण्यात धन्यता मानली जाते. समाजमाध्यमांवर घडणाऱ्या या घटनांमुळे काही वेळा वादाचे प्रसंग घडत असून, याचे पर्यवसान मारामारीत झाले आहे.

हेही वाचा- कार्यकर्त्यांचा हट्ट  ५५५५ फिट्ट ; संपत पवार-पाटीलांची गोष्टच न्यारी

मारहाणीचे प्रकार
गतवर्षी सामन्यानंतर विरुद्ध संघाच्या समर्थकाला मारहाणीचा प्रकार झाला होता. यानंतर दोन्ही संघांच्या समर्थकांत हाणामारी झाली होती. असे प्रकार शिये, राजारामपुरी, पंचगंगा नदी परिसर या ठिकाणी झाले होते. नंतर हे प्रकरण आपापसातील सामंजस्याने निकाली काढण्यात आले होते.
 

पोस्टर वॉर
आयपीएल स्पर्धेतील सहभागी संघांच्या समर्थकांत समाजमाध्यमांवरच नव्हे, तर प्रत्यक्षात पोस्टर वॉर रंगले आहे. शहरातील अनेक भागासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी चाहत्यांनी आवडत्या संघाचे आणि संघ नायकाचे पोस्टर लावले आहेत. सामन्यानंतर अनेकदा या पोस्टरसमोर येऊन समर्थक आनंद व्यक्त करतात.

हेही वाचा- कारवाई करणारेच जाळ्यात ;  मटका व्यावसायिकांकडून लाचलुचपतकडे फिर्याद -

पोलिसांचे लक्ष 
सध्या कोरोनामुळे एकत्र येऊन आनंद साजरा करायला मनाई आहे. मात्र, आवडता संघ विजयी झाल्याच्या आनंदात गर्दी केल्यास आणि शासनाच्या नियमांचा भंग केल्यास कारवाई होईल.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 13th season of IPL has started colorful social war of the competition Painted by Status DP and Mims kolhapur people