esakal | 'या' राज्यात 182 जणांची कोरोनावर मात; प्रकृती सुधारल्याने दिला डिस्चार्ज 
sakal

बोलून बातमी शोधा

182 corona positive patient reports are negative in karnataka

जिवघेण्या कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतासह कर्नाटकातही विषाणू पाय पसरत आहे. राज्यात आतापर्यंत 511 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पण, रुग्ण बरे होण्याची संख्याही चांगली आहे.

'या' राज्यात 182 जणांची कोरोनावर मात; प्रकृती सुधारल्याने दिला डिस्चार्ज 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - राज्यात नवीन आठ रुग्णांची आज (ता.27) भर पडली. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा 511 वर पोचला आहे. तसेच कोरोनावर मात केलेल्यांची संख्याही चांगली आहे. आतार्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 182 आहे. त्यापैकी बेळगाव जिल्ह्यात 6 जण आहेत.

जिवघेण्या कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतासह कर्नाटकातही विषाणू पाय पसरत आहे. राज्यात आतापर्यंत 511 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पण, रुग्ण बरे होण्याची संख्याही चांगली आहे. 182 जणांची आतापर्यंत प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज दिला आहे. बंगळूरमध्ये सर्वाधिक 57, म्हैसूरला 38 जणांना डिस्चार्ज दिलेला आहे. त्यापाठोपाठ चिक्कबळ्ळापूर आणि मंगळूर येथील प्रत्येकी अकरा, कारवार येथील 10 जणांना डिस्चार्ज दिला आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये सहा जणांना आतापर्यंत घरी सोडले आहे. त्यामध्ये हिरेबागेवाडी येथील तिघे, कुडचीतील दोघे आणि बेळगुंदीतील एकाचा समाविष्ट आहे.

हे पण वाचा - मोठा दावा!  कोरोनावर आहे या थेरेपीचा पर्याय


कोरोनाचा दहा जिल्ह्यात प्रवेश नाही

राज्यात 10 जिल्ह्यात कोरोना संसर्गचे रुग्ण नाहीत. वीस जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये बंगळूर (57), म्हैसूर (38), बेळगाव(6), विजापूर (0), गुलबर्गा (7), बाललकोट (7), चिक्कबळ्ळापूर (11), मंगळूर (11), बिदर (9), मंड्या (4), बंगळूर ग्रामीण (8), कारवार (10), धारवाड (2), गदग (0), उडपी (3), दावणगेरी (2), तुमकूर (1), चित्रदूर्ग (1), कोडगू (1) आदी जिल्ह्यांचा समाविष्ट आहे. उर्वरित जिल्ह्यात संसर्ग झाला नाही. 

हे पण वाचा -   अन् घेतले व्हिडिओ कॉलिंगवरून पतीचे अंतीम दर्शन...