ब्रेकिंग - कोल्हापुरात कोरोनाचे दीड शतक पार, आणखी 19 जण पाॅझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

19 जणांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता 155 वर पोहोचली आहे.

कोल्हापूर -  जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून नुक्त्याच आलेल्या अहवाालानुरा आणखी 19 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

19 जणांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता 155 वर पोहोचली आहे. गेल्या सहा ते सात दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संखेत रोजच भर पडत आहे. त्यामुळे जिल्हावासियांच्याही चिंतेत भर पडत आहे.

दरम्यान, मुंबईवरून कोल्हापुरात आलेल्यांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह येत असल्याने जिल्ह्यात बाधितांच्या संखेत भर पडत आहे. रूग्ण संख्या वाढत असली तरी कोल्हापुकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे राज्य शासनाने वाढवलेल्या लॉकडाऊनच्या नियम व अटींमध्ये कोल्हापूरला जैसे थे ऑरेंज झोनमध्ये ठेवले आहे. त्यामुळे, कडक आणि सक्त नियमांचा रेडझोन कोल्हापूरकरांना वाट्याला आलेला नाही. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांना लागू असणाऱ्या नियम अटींचे परिपत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 19 Corona positive patient found in kolhapur