Covid Update : कोल्हापुरात २१० जणांनी केली कोरोनावर मात

शिवाजी यादव
Tuesday, 22 September 2020

सीपीआरमध्ये व्हेन्टीलेटर व ऑक्‍सिजनची सोय सक्षम असली तरी गंभीर बाधितांची संख्या जास्त आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभरात 210 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. जवळपास 160 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. एकूण बाधितांची संख्या 40 हजार 360 झाली आहे तर कोरोनामुक्तांची संख्या 28 हजार 812 झाली आहे. तर दिवसभरात 5 बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे आजवरची एकूण मृतांची संख्या एक हजार 282 झाली आहे. त्यामुळे कोरोनाची भिती कायम आहे. 

हेही वाचा - Video : एक रुपयाचा कडीपत्ता सरकार झाले बेपत्ता  : कोल्हापुरात एक हजारांहून अधिक महिलांचा मोर्चा 

 

गेल्या चार दिवसात एकूण 380 व्यक्ती गंभीर सापडल्या आहेत. त्यापैकी सीपीआरमध्ये 290 आयजीएममध्ये 32 तर गडहिंग्लजमध्ये 16 तर उर्वरीत खासगी रूग्णालयात 60 जणांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय जिल्ह्यातील 14 शासकीय रूग्णालयात दिवसभरात जवळपास 1 हजार 122 व्यक्तींचे स्वॅब घेतले आहेत. जिल्ह्यातील 79 कोवीड सेंटरवरील सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. उर्वरीत सर्व गंभीर बाधितांवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा - कोल्हापुरात पावसाची पुन्हा एंट्री : दोन दिवस रिपरिप सुरुच राहणार

 

गेल्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या आजरा, गडहिंग्लज, भुदरगड, गगनबावडा येथे कमी होत आहे. तसेच कोरोनामुक्तांची संख्या वाढती आहे. त्यामुळे याभागात कोवीड सेंटरवर बेड उपलब्ध होत आहेत. सीपीआरमध्ये व्हेन्टीलेटर व ऑक्‍सिजनची सोय सक्षम असली तरी गंभीर बाधितांची संख्या जास्त आहे. यातील बहुतांशीजणांना कोल्हापूरात उपचारासाठी आणले जात आहे. त्यामुळे सीपीआरसह खासगी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या गंभीर बाधितांची संख्या वाढली आहे. 

 

संपादन - स्नेहलत कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 210 people have successfully fight against kolhapur but 160 people are positive found today