गुंगीचे औषध देऊन लातूरच्या नऊ कलाकारंना लुटले; यात्री निवास मधील प्रकार

राजेश मोरे
Wednesday, 3 February 2021

वणातून गुंगीचे औषध देत नऊ कलाकार प्रवाशांना लुटण्याचा धक्कादायक प्रकार आज दुपारी उघडकीस आला.

कोल्हापूर : जेवणातून गुंगीचे औषध देत नऊ कलाकार प्रवाशांना लुटण्याचा धक्कादायक प्रकार आज दुपारी उघडकीस आला. गंजी गल्ली येथील एका यात्रीनिवास मध्ये हे प्रवासी उतरले होते. त्या सर्वांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी सीपीआरमध्ये दाखल केले. घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 
राचेनेवाडी ता.चाकूर जिल्हा लातूर येथील कुंताबाई कवरे, द्रोपदाबाई सूर्यवंशी, कुमा बाई कांबळे, सखुबाई सूर्यवंशी, लताबाई सूर्यवंशी, मशीनची चिंचोळे, राम किसन कवरे, मल्हारी सूर्यवंशी, अशोक भुरे हे नऊ जणाना देवीचा कार्यक्रम करण्यासाठी कोल्हापुरातील एकाने बोलवले होते. याबाबतचा सोशल मीडियावर निरोप देऊन 14 हजार रुपये कार्यक्रमासाठी देऊ असे सांगून अडीच हजार रुपये चा ॲडव्हान्स ही दिला होता.

हेही वाचा- गोकुळ सभेत गोंधळ: घोषणाबाजीने वातावरण तापले

गंजी गल्लीतल्या यात्री निवास मधील प्रकार

काल रात्री हे नऊ जण एसटीने कोल्हापुरात रात्री उशिरा आले. त्याला संबंधित व्यक्तीने गंजी गल्ली येथील एका यात्री निवास मध्ये राहण्याची सोय करून दिली. यानंतर त्यांना जेवण देण्यात आले. या जेवणात गुंगीचे औषध घातल्याने हे नऊ जण बेशुद्ध होऊन पडले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या दागिने व मोबाईल वर हात मारला असे शुद्धीत आलेल्या प्रवाशांकडून सांगण्यात आले. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये तातडीने पोलिसांनी हलवले. नेमका प्रकार काय झाला किती दागिने गेले आधीची माहिती सर्वजण पूर्णपणे शुद्धीवर आल्यानंतर समजू शकेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbed nine artists from Latur giving them drugs crime case in kolhapur marathi news