
इचलकरंजी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेपासून पाचशे मीटरपर्यंत असलेल्या अंगणवाड्या प्राथमिक शाळेला जोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे हातकणंगले तालुक्यातील सुमारे 24 टक्के अंगणवाड्या प्राथमिक शाळेला जोडल्या जाणार आहेत.
बालकांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्यासाठी या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. तालुक्यातील एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत तीन विभागात सुरू असणाऱ्या पाचशे मीटरपर्यंतच्या सर्व अंगणवाड्यांचे संलग्नीकरण होणार आहे. तसेच पायाभूत सुविधांसह अंगणवाडी सेविकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
अंगणवाडीतील बालके प्राथमिक शिक्षणात मागे पडत असल्याचे शासनाला आढळले. पूर्व प्राथमिक शिक्षणाला सध्या कोणत्याही कायद्याचे बंधन नसल्यामुळे अभ्यासक्रमांपासून ते शुल्क आकारणीपर्यंत कोणत्याही गोष्टींवर सरकारचा अंमल नाही. हीच बाब लक्षात घेऊन नवीन शैक्षणिक धोरणात अंगणवाडीचा वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्याची सूचना झाली.
तीन ते सहा वयोगटातील बालकांना दर्जेदार पूर्व प्राथमिक शिक्षण मिळावे, यासाठी अंगणवाड्या सुरू केल्या. परंतु पहिलीत प्रवेश घेताना बालके मागे पडत असल्याने शासनाच्या निदर्शनास आले. आता अंगणवाडीतून बाहेर पडल्यानंतर बालकांना प्राथमिक शिक्षण चांगले मिळावे, त्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडल्या जातील. सहा वर्षे पूर्ण केल्यानंतर संबंधित बालके लगतच्या शाळेत प्रवेश घेतील.
पाचशे मीटरच्या आत असलेल्या अंगणवाड्यांची आकडेवारी शासनाला कळवावी, अशा सूचना शिक्षण खात्याला दिल्या आहेत. हातकणंगले तालुक्यातील एकूण अंगणवाड्यापैंकी सुमारे 24 टक्के अंगणवाड्या प्राथमिक शाळेच्या 500 मीटर अंतरापर्यंत आहेत. तीन विभागात त्यांचे विभाजन झाले आहे. हातकलंगले एक मध्ये 37, हातकणंगले दोन मध्ये 63 आणि हातकणंगले तीन मध्ये 26 अंगणवाडी येतात. ही अंगणवाडी केंद्र प्राथमिक शाळांना जोडून अधिक सक्षम केली जाणार आहेत.
प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची आवश्यकता
अंगणवाडी सेविकांचे किमान शिक्षण हे बारावी किंवा समकक्ष असावे. तसेच त्यांनी किमान सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. सध्या यापेक्षा कमी शिक्षण असलेल्या सेविका सेवेत असतील, तर त्यांना एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.
दृष्टीक्षेपात
एकूण अंगणवाडी - 533
500 मीटर अंतरापर्यंत - 126
टक्केवारी - 23.63
संपादन - सचिन चराटी
kolhapur
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.