चंद्रकांत पाटील यांना घरभर चिठ्ठ्या वाटतानाचा फोटो मी पाहिला : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

शरद पवार म्हणाले 'चंद्रकांत पाटील यांना घरभर चिठ्ठ्या वाटतानाचा फोटो मी पाहिला'...

कोल्हापूर - दिल्ली निवडणुकीत सपाटुन मार खाल्या नंतर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीत काँग्रेसने आम आदमी पार्टीशी हातमिळवणी केली होती.त्यामुळे आमचा पराभव झालाय असं म्हटलं होतं.यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले 'चंद्रकांत पाटील यांना घरभर चिठ्ठ्या वाटतानाचा फोटो मी पाहिला' त्यामुळे अशा राष्ट्रीय नेत्यावर मी काय बोलणार असा खोचक टोला पवार यांनी लगावला. कोल्हापुर दौर्यावर असताना ते पंचशील हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

वाचा - भीमा - कोरेगाव प्रकरणी निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा : शरद पवार
 

केंद्राने अधिकार काढून घेणे योग्य नाही

भीमा-कोरेगाव प्रकरणी निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे.मात्र राज्यघटनेनुसार कायदा आणि सुव्यवस्था याबाबतचा अधिकार राज्य शासनाला आहे. त्यामुळे राज्यांचा अधिकार काढून घेणे योग्य नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केंद्रावर निशाणा साधला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा