"महावितरण'ची 327 कोटींची बिले थकीत, कोल्हापूर परिमंडळातील चित्र

शिवाजी यादव
Saturday, 17 October 2020

कोल्हापूर ः कोरोनामुळे दीर्घकाळ लॉकडाउन झाला. उद्योग, व्यवसाय डबघाईला आले. बेरोजगारीचा प्रश्‍न आणि चिंता वाढली. घरखर्च भागविताना सर्वसामान्य वर्ग हवालदिल झाला. अशात वीजबिलांची दरवाढ झाली. महिन्याला 300 रुपये येणारे वीजबिल 400-500 रुपयांच्या घरात आले. वीजबिल माफ होईल, अशी हूल कोणीतरी उठवली. यात राज्य शासनाने कोणाचाही वीजपुरवठा खंडित करू नका, असे आदेश दिले. यातून ज्यांना वीजबिल भरणे शक्‍य होते, त्यांनीही वीजबिल भरले नाही. अशात "महावितरण'च्या वीजबिल थकबाकीचा आकडा फुगला आहे. तो कोल्हापूर परिमंडळात 327 कोटी रुपयांवर गेला. त्याच्या वसुलीचा पेच निर्माण झाला आहे. 

कोरोना संसर्गामुळे लॉकडाउनचा कालावधी वाढवावा लागला. घरखर्चालाही अनेकांनी कात्री लावली. यातही वीजबिल आज वा उद्या भरू, असे करीत एक-दोन महिने गेले. वीजपुरवठा खंडित होणार नाही, याचीही खात्री मिळाली, तसेच स्वतःहून वीजबिल भरणाऱ्यांचे प्रमाण 90 टक्‍क्‍यांवरून घसरत सध्या 60 टक्‍क्‍यांवर आले आहे. 

लॉकडाउन काळात बहुतांश समुदाय घरीच होता. या काळात पाणी व विजेचा वापर वाढला. तशी विजेची मागणी वाढली, महावितरण वीज रोखीने खरेदी करते. ती वीज साठविता येत नाही. त्यामुळे तिचा पुरवठाही अखंड सुरूच ठेवला. मार्च ते जून या महिन्यात लॉकडाउनमुळे रीडिंग घेतले नाही. जूननंतर रीडिंग घेतले. यापुढेही महावितरण वीजपुरवठा करणार आहे. वीज ग्राहकांनी वीजबिल भरावे. तसेच, चुकीचे बिल भरू नका, ती बिले "महावितरण'कडून दुरुस्त करून घ्यावीत. 
- सुधाकर निर्मळे, मुख्य अभियंता 

-संपादन - यशवंत केसरकर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 327 crore bills of "Mahavitaran" in arrears, picture in Kolhapur circle