इचलकरंजीत कुडचे मळा कनेक्‍शनमधून 33 रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

इचलकरंजी शहरात आज पुन्हा तीन कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे शहराने रुग्ण संख्येचे अर्धशतक पार केले आहे.

इचलकरंजी : शहरात आज पुन्हा तीन कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे शहराने रुग्ण संख्येचे अर्धशतक पार केले आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बॅंक कर्मचारी तसेच भाजी विक्रेत्या महिलेचा समावेश आहे. 

शहरात गेली 11 दिवस कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. आज बाराव्या दिवशीही तीन रुग्ण वाढले. यामध्ये कलानगर येथील यापूर्वी त्रिशूल चौक कनेक्‍शनमधून पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या नातेवाइकाचा समावेश आहे. त्याचबरोबर गुरुकन्ननगरमधील यंत्रमाग कामगाराच्या पत्नीचाही समावेश आहे. कुडचे मळा कनेक्‍शनमधून महिलेच्या पतीलाही संसर्ग झाला होता. 

भाग्यरेखा टॉकीजजवळ असलेल्या महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटीतील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. ही महिला आण्णा रामगोंडा शाळेजवळील मार्केटमध्ये भाजीपाला विकत होती. दोन दिवसांपूर्वी तिला धाप लागली होती. खासगी डॉक्‍टरने तिला तातडीने आयजीएम रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्यानुसार तिला कालच आयजीएममधून सीपीआरमध्ये हलविले होते. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्यांचा शोध प्रशासन घेत आहे. 

रुग्ण 42 वर 
आजच्या तीन वाढलेल्या रुग्णांमुळे संसर्ग झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या आता 51 वर पोहोचली आहे. यामध्ये कुडचे मळा कनेक्‍शनमधून 33 रुग्ण, तर त्रिशूल चौक कनेक्‍शनमधून 8 रुग्ण आहेत. यामुळे आता ऍक्‍टिव्ह रुग्ण संख्या 42 वर पोहोचली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 33 patients from Ichalkaranjit Kudche Mala connection