कोल्हापूर : सीपीआरमध्ये दुरुस्तीअभावी 40 व्हेंटिलेटर पडून

40 ventilators are not used for patients in cpR hospital kolhapur
40 ventilators are not used for patients in cpR hospital kolhapur

कोल्हापूर : बाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन प्रशासनाने सीपीआर पूर्ण वेळ कोरोना रुग्णालय जाहीर केले आहे. गतवर्षी रुग्णालयाला शंभराहून अधिक व्हेंटिलेटर आले होते. त्यातील ४० हून अधिक दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. यातील पंधरा नादुरुस्त आहे. सात व्हेंटिलेटर बसविलेले नाहीत. त्यामुळे बाधित उपचाराला आल्यास पेच निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

सीपीआरला गतवर्षी केंद्र सरकारच्या निधीतून १० व्हेंटिलेटर मिळाली; मात्र जुने नवे व्हेंटिलेटर गरजेनुसार वापरात आली. गतवर्षी एप्रिलमध्ये कोरोना सुरू झाला. त्यानंतर मे महिन्यात प्रादुर्भाव वाढला जून ते सप्टेंबर महिन्यात बाधितांची सर्वाधिक संख्या होती, यात गंभीर बाधितांना व्हेंटिलेटर मिळत नव्हते. व्हेंटिलेटर बेडअभावी अनेकांना हाल सोसावे लागले होते. याच वेळी केंद्र, राज्य शासन तसेच स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने जवळपास ७० हून अधिक व्हेंटिलेटर मिळाली. त्यातील दहा सीपीआरने पालिकेला दिली होती. तेच व्हेंटिलेटर पालिकेने पुन्हा सीपीआरला दिले.

गतवर्षी ऑक्‍टोबरपासून बाधितांची संख्या कमी होऊ लागताच जानेवारीत सीपीआरमधील बाधितांची संख्या शंभरच्या आत आली. त्यानंतर सीपीआरमध्ये अन्य आजारातील रुग्ण तसेच जखमींवर उपचार सेवा सुरू झाले. तेव्हापासून निम्म्यापेक्षा जास्त व्हेंटिलेटर वापरात नाहीत. बहुतांशी अभियंता बाहेरचे आहे. त्यांनी व्हेंटिलेटरच्या कंपनीने वॉरंटी दिल्यानुसार नादुरुस्त व्हेंटिलेटर दुरुस्त करून द्यायचे आहेत. असे असताना सीपीआरकडून पाठपुरावा झाला मात्र कंपन्यांनीही फारशी दखल घेतली नाही. अशात महिनाभरापासून बाधितांची संख्या वाढत आहे. गंभीर रुग्णांची संख्या आणखी वाढल्यास त्यांना सीपीआरमध्येच उपचाराला यावे लागणार आहे. त्यामुळे ऐनवेळी व्हेंटिलेटर कमी पडण्याचा धोका अद्याप कायम आहे.

"सीपीआरकडे १०१ व्हेंटिलेटर आहेत. यातील काही नादुरुस्त आहेत, त्यांच्या दुरुस्तीसंदर्भात संबंधित कंपनीच्या तंत्रज्ञांकडे पाठपुरावा सुरू आहे. सध्या ७६ व्हेंटिलेटर वापरात आहेत, यातील काही एक सुरू असताना दुसरा बंद पडतो, तोही दुरुस्त करून घेण्यात येतो."

- डॉ. एस. एस. बर्गे, वैद्यकीय अधीक्षक, सीपीआर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com