
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालल्याने कोल्हापूरच नव्हे तर अख्ख्या पुणे विभागात चिंता आहे. पुण्यानंतर सर्वाधिक रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यात आढळत आहेत. बाधितांच्या तत्काळ संपर्कात येणाऱ्या लोकांची संख्या मोठी असल्याने या चिंतेत भर पडली आहे. रविवार अखेर (ता.19) 41 हजार 613 लोक हे हाय रिस्क अर्थात तीव्र जोखमीत आहेत, तर 31 हजार 469 लोक हे कमी जोखमीत आहेत. तीव्र जोखमीत असणाऱ्या व्यक्तीची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येत आहेत.
जिल्ह्यात 20 दिवसांत दीड हजारपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अनेक लोकांना कोरोना झाला तरी त्यांना कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. लक्षणे दिसत नसल्याने संबंधित कोरोनाग्रस्ताचा वावर नियंत्रणात नसतो, मात्र अहवाल येईपर्यंत त्या व्यक्तीकडून अनेक लोकांशी संपर्क होतो. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर यंत्रणेचे मात्र धावपळ होते. बाधिताच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचे प्रमाणही लक्षणीय आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या प्रथम संपर्कात येणाऱ्या लोकांची संख्या 41 हजार 613 इतकी मोठी आहे. या सर्वाना हाय रिस्क म्हणजेच तीव्र जोखमीच्या गटात टाकून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. त्याचे गुगल ट्रॅकिंग करण्यात येते. या माध्यमातून त्यांची सर्व माहिती संकलित करून, अशा वर्गवारीतील सर्व लोकांना कोविड काळजी केंद्रात उपचारासाठी ठेवले जात आहे. कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात सर्वसाधारणपणे 15 लोक येतात. जे तीव्र बाधित गटात येतात. यातील लक्षणे असणाऱ्या लोकांचे स्वॅब घेतले जातात. जर स्वॅब पॉझिटिव्ह आला तर रुग्णालयात उपचार केले जातात, मात्र कोरोनाची कोणतीच लक्षणे नसतील तर संबंधित व्यक्तींना संस्थेत किंवा घरीच अलगीकरण करण्यात येते. हाय रिस्क वर्गवारीत असलेल्या एकूण लोकांपैकी 10 टक्के लोकांना कोरोना होण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका शहर तीव्र जोखीमचे रुग्ण कमी जोखीमचे रुग्ण
आजरा 707 440
भुदरगड 520 256
चंदगड 2175 86
गडहिंग्लज 2330 1830
गगनबावडा 52 24
हातकणंगले 1670 1889
कागल 339 276
करवीर 1078 1075
कोल्हापूर शहर 1380 1465
पन्हाळा 194 280
राधानगरी 349 193
शाहूवाडी 1121 946
शिरोळ 254 383
इतर जिल्हा 290 204
एकूण 41613 31469
तीव्र जोखीम असलेल्या रुग्णांवर आरोग्य विभागाचे लक्ष आहे. यातील लक्षणे असणाऱ्या लोकांचे स्वॅब घेणे, पॉझिटिव्ह असेल तर उपचार करणे अन्यथा त्यांचे अलगीकरण करण्यात येते. तीव्र जोखमीतील रुग्णांना एकापेक्षा अधिक आजार असतील तर मात्र धोका जास्त असतो, मात्र प्रतिकारशक्ती चांगली असेल तर औषधोपचाराशिवाय अनेक लोक बरे होतात. - डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.
संपादन - यशवंत केसरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.